‘राजी’ ठरला आलिया भट्टच्या करिअरमधील दुसरा सर्वाम मोठा हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 11:18 AM2018-05-28T11:18:30+5:302018-05-28T16:48:30+5:30

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरचे सगळे विक्रम मोडीत काढले आहे. हा चित्रपट केवळ मेघना गुलजार यांचाच सर्वात ...

'Razi' was the second biggest hit in Alia Bhatt's career | ‘राजी’ ठरला आलिया भट्टच्या करिअरमधील दुसरा सर्वाम मोठा हिट

‘राजी’ ठरला आलिया भट्टच्या करिअरमधील दुसरा सर्वाम मोठा हिट

googlenewsNext
घना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरचे सगळे विक्रम मोडीत काढले आहे. हा चित्रपट केवळ मेघना गुलजार यांचाच सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला नाही तर या चित्रपटाची लीड अ‍ॅक्ट्रेस आलिया भट्ट हिचा आत्तापर्यंतच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. या पीरियड स्पाई थ्रीलर चित्रपटास समीक्षक आणि प्रेक्षक दोघांचेही प्रेम लाभले आहे. केवळ इतकेच नाही तर आलिया हा चित्रपट तिचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘राजी’ची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड बघता लवकरच हा चित्रपट आलियाच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’चा विक्रम तोडेल, असे वाटू लागले आहे. ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ने बॉक्सआॅफिसवर ११६़६८ कोटी रूपयांची कमाई केली होती. ‘राजी’ने आत्तापर्यंत १०२़५० कोटींचा पल्ला गाठला आहे. लवकरच हा चित्रपट ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’चा रेकॉर्ड तोडून आलियाचा सर्वात मोठा हिट चित्रपट बनेल, ही शक्यता त्यामुळेच नाकारता येत नाही. ‘राजी’ने आलियाच्या ‘2 स्टेट्स’च्या लाईफ टाईम कलेक्शनलाही (१०२़१३ कोटी) मागे टाकले आहे.
‘राजी’ने एका पाठोपाठ एक असे अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. २०१८ मध्ये आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या ‘पद्यावत’,‘बागी2’,‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘रेड’ या चित्रपटानंतर ‘राजी’ हा चित्रपट पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या यशाने केवळ आलिया भट्ट हिचाच नाही तर विकी कौशलचाही फायदा झाला आहे. त्याचाही हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक हिट चित्रपट ठरला आहे.
साहजिक या यशाने आलिया व विकी दोघेही सध्या जाम खूश आहेत. खरे तर आलियासाठी हे यश अनपेक्षित आहे. मी कधीही इतक्या मोठ्या यशाची अपेक्षा केली नव्हती. पण प्रेक्षकांनी हा चित्रपट असा काही डोक्यावर घेतला की, आम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला. मी सध्या प्रचंड आनंदी आहे. विशेषत: मेघनासाठी मी अतिशय आनंदी आहे. या चित्रपटासाठी मेघना अनेक महिने नीट झोपली नाही. चित्रपटाच्या रिलीजआधी ती अतिशय नर्व्हस होती. पण रिलीजनंतरचे चित्र पाहून मेघना आम्ही सर्वच अवाक् झालोत,असे ती म्हणाली.

Web Title: 'Razi' was the second biggest hit in Alia Bhatt's career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.