​‘पद्मावत’साठी रणवीर सिंगला मिळाला पहिला खास पुरस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 05:26 AM2018-01-30T05:26:30+5:302018-01-30T11:00:27+5:30

‘पद्मावत’ देश-विदेशात बॉक्सआॅफिस धूम करत असताना या चित्रपटात अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणा-या रणवीर सिंग याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. ...

Ranveer Singh got first special award for 'Padmavat'! | ​‘पद्मावत’साठी रणवीर सिंगला मिळाला पहिला खास पुरस्कार!

​‘पद्मावत’साठी रणवीर सिंगला मिळाला पहिला खास पुरस्कार!

googlenewsNext
द्मावत’ देश-विदेशात बॉक्सआॅफिस धूम करत असताना या चित्रपटात अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणा-या रणवीर सिंग याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. आता तर महानायक अमिताभ बच्चन यांनीही रणवीरचे भरभरून कौतुक केले आहे. रणवीरने साकारलेला अलाऊद्दीन खिल्जी पाहून अमिताभ कमालीचे भारावले आहेत. आता इतके भारावले म्हटल्यावर रणवीरचे खास अभिनंदन तर व्हायलाच हवे ना? अमिताभ यांनी रणवीरचे खास पुष्पगुच्छ आणि स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र पाठवून रणवीरचे अभिनंदन केलेयं. अमिताभ यांची ही भेट पाहून रणवीरही गद्गगदला नसेल तर नवल. महानायकाच्या कौतुकाने तोही भारावून गेला. टिष्ट्वटरवर त्याने हा आनंद शेअर केला.


‘मला ‘पद्मावत’साठी माझा पहिला पुरस्कार मिळाला. मिस्टर बच्चन याचे पत्र मिळालेय. त्यांचे हे पत्र आणि त्यांनी पाठवलेली फुलांची भेट माझ्यासाठी काय आहेत, हे मी शब्दांत सांगू शकत नाही.  मिस्टर बच्चन मला कायम आपलेसे वाटत आले आहेत. प्रत्येकवेळी माझ्या अभिनयाचे कौतुक करण्यासाठी ते स्वत: हाताने लिहिलेले पत्र पाठवतात. मला जेव्हा केव्हा त्यांचे पत्र मिळते, मी ते फ्रेम करतो. यानंतर ती फ्रेम थेट बँक लॉकरमध्ये जाते. मी ती फ्रेम केलेली पत्रे घरी ठेवू शकत नाही. त्यांची ही शाब्बासकीची थाप माझ्यासाठी अनमोल आहे. माझे सगळे अवार्ड्स घराच्या कपाटात रचलेले दिसतील. पण अमिताभ यांनी लिहिलेली पत्रे मी बँक लॉकरमध्ये ठेवली आहेत, असे रणवीरने लिहिलेयं.
अर्थात अमिताभ  पहिल्यांदा रणवीरच्या अभिनयावर भाळलेले नाहीत. यापूर्वीही त्यांनी रणवीरला असेच स्वहस्ताक्षरातील पत्र आणि फुले पाठवली होती. होय, २०१५ मध्ये ‘बाजीराव मस्तानी’मधील अभिनयासाठी त्याला अमिताभकडून असेच सरप्राईज मिळाले होते.

ALSO READ : ​भन्साळींचा ‘खिल्जी’ रणवीर सिंगने चाहत्यांसाठी लिहिला १७१ शब्दांचा सुंदर संदेश! तुम्हीही वाचा!!

‘पद्मावत’ने पहिल्याच वीकेंडमध्ये १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने ११४ कोटी कमावले आहेत. ‘पद्मावत’ शूटींगच्या पहिल्या दिवसापासूनच वादात सापडला होता. या वादामुळे चित्रपटाचे रिलीज दोनदा पुढे ढकलावे लागले होते. अखेर अनेक वादानंतर गत २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज झालाय.

Web Title: Ranveer Singh got first special award for 'Padmavat'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.