‘रंगून’चा ट्रेलर: ‘वॉर’ आणि ‘रोमान्स’ एकाच ठिकाणी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 01:27 PM2017-01-06T13:27:16+5:302017-01-06T13:27:16+5:30

rangoon trailer kangana ranaut saif ali khan and shahid kapoor : rangoon trailer : kangana ranaut : saif ali khan : shahid kapoor : विशाल भारद्वाज यांचा पीरियड रोमॅन्टिक ड्रामा ‘रंगून’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. कंगना राणौत, शाहीद कपूर आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची बॉलिवूडप्रेमींना बरीच प्रतीक्षा होती.

'Rangoon' Trailer: 'War' and 'Romance' in one place !! | ‘रंगून’चा ट्रेलर: ‘वॉर’ आणि ‘रोमान्स’ एकाच ठिकाणी!!

‘रंगून’चा ट्रेलर: ‘वॉर’ आणि ‘रोमान्स’ एकाच ठिकाणी!!

googlenewsNext
शाल भारद्वाज यांचा पीरियड रोमॅन्टिक ड्रामा ‘रंगून’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर  रिलीज झाला. कंगना राणौत, शाहीद कपूर आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची बॉलिवूडप्रेमींना बरीच प्रतीक्षा होती. अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली आणि ‘रंगून’चा ट्रेलर सर्वांसमोर आला.
रोमान्स आणि अ‍ॅक्शन असा सगळा मसाला असलेल्या या ट्रेलरमध्ये कंगना, शाहीद व सैफ या तिघांचाही दमदार अभिनय पाहायला मिळतोय. चित्रपटाची कथा १९४० व्या दशकातील (दुसरे महायुद्ध) आहे. यात ‘वॉर’ आहे. तसेच ‘रोमान्स’ही आहे. शाहीद यात एका लष्करी अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. कंगनाने यात अ‍ॅक्शन दिवा मिस ज्युलियाची भूमिका साकारली आहे. मिस ज्युलिया ४० च्या दशकातील स्टंटवूमन आहे. तर सैफ एका राजकुमाराच्या भूमिकेत आहे. 

‘रंगून’ हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ते ‘मेरे पिया गए रंगून...’ हे गाणे. मात्र विशाल भारद्वाज यांचा ‘रंगून’ हा सिनेमा अतिशय आगळा-वेगळा सिनेमा असल्याचे सांगण्यात येत आहे. अरूणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये शूट झालेला हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. या चित्रपटासाठी कंगनाने बरीच तयारी केली आहे. चित्रपटाच्या रिचर्ससाठी ती अमेरिका आणि मेक्सिकोलाही गेली होती.



इंग्रजांचे काही लढाऊ नौका काही लोकांनी अंदाधूंद गोळीबार करतात, अशा एका दृश्याने ‘रंगून’च्या ट्रेलरची सुरुवात होते. ट्रेलरचे दुसरे दृश्य येईपर्यंत या चित्रपटाला दुसºया महायुद्धाची पार्श्वभूमी आहे, हे तुमच्या लक्षात येते.हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर काय कमाल करतो, हे लवकरच कळेलच. पण सिनेप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत, हे मात्र नक्की. ‘उडता पंजाब’नंतर शाहीदचा हा पहिला चित्रपट असेल. तर सैफ अली खानही दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर वापसी करतोय. अलीकडे शाहीदने या चित्रपटाचे एक पोस्टर आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले होते. यात शाहीद व कंगनाचा रोमान्स पाहायला मिळाला होता.

Web Title: 'Rangoon' Trailer: 'War' and 'Romance' in one place !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.