रणबीर कपूरचा सोशल मीडियावर डेब्यू , ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 10:38 AM2018-06-16T10:38:28+5:302018-06-16T16:18:13+5:30

संजू चित्रपटामुळे आणि आलिया भट्टमुळे रणबीर कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे. रणबीरचा नुकताच आगामी चित्रपच संजूचा ट्रेलर रिलीज झाला ...

Ranbir Kapoor shares social media on Debu, Twitter | रणबीर कपूरचा सोशल मीडियावर डेब्यू , ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

रणबीर कपूरचा सोशल मीडियावर डेब्यू , ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

googlenewsNext
जू चित्रपटामुळे आणि आलिया भट्टमुळे रणबीर कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे. रणबीरचा नुकताच आगामी चित्रपच संजूचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात रणबीरने केलेल्या संजूच्या भूमिकेचे सगळीकडे कौतूक होताना दिसतेय. हा चित्रपट संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित यात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारतोय. तुम्हाला लक्षात असेल दिग्दर्शकांनी सांगितले होते की, फादर्स डे ला ते एक सरप्राईज देणार आहेत. मात्र त्यांनी हे सरप्राईज एकदिवस आधीच दिले आहे. सोशल मीडियावर रणबीर कपूरला पाहाणे कोणत्या सरप्राईज पेक्षा कमी नाही.   
 






रणबीर कपूर अजून पर्यंत सोशल मीडियावर नव्हता. त्याच्या नावाचे फॅन पेज फेसबुकवर आहे मात्र रणबीर कपूर अजूनपर्यंत सोशल मीडियावर नव्हता त्यांने आज सोशल मीडियावर डेब्यू केले आहे. रणबीरचा व्हिडिओ फॉक्स स्टार हिंदीच्या ट्विटर हँडलने अपलोड केला. या व्हिडिओला कॅप्शन लिहिले आहे, सगळं काही सोडून द्या. पहिल्यांदा रणबीर कपूर सोशल मीडियावर आला आहे. मात्र रणबीरने स्वत: सांगितले आहे की हे संडेचे सरप्राईज नाही आहे. मात्र रणबीरचा सोशल मीडियावर डेब्यू हा त्याच्या फॅन्ससाठी सरप्राईज पेक्षा कमी नाही. संजूच्या ट्रेलर लाँचिंगच्या दरम्यान रणबीरने तो सोशल मीडियावर पासून दूर का राहतो याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो म्हणाला होता चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडिया हे चांगले माध्यम आहे मात्र मी इथं येण्याबाबत अजून काही विचार केलेला नाही. आता रणबीरचे फॅन त्याच्या रविवारच्या सरप्राईजची आतुरतेने वाट पाहत आहेत.'संजू' चित्रपट येत्या २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे  यात रणबीरसह मनीषा कोईराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दीया मिर्झा आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 
 {{{{twitter_post_id####}}}}


 

Web Title: Ranbir Kapoor shares social media on Debu, Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.