Race-3 Trailer Out : श्वास रोखणाऱ्या तुफान अ‍ॅक्शनचा धमाका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 01:06 PM2018-05-15T13:06:30+5:302018-05-15T18:36:30+5:30

सलमान खान याच्या बहुप्रतिक्षित ‘रेस-३’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये अपेक्षेप्रमाणेच तुफान अ‍ॅक्शन बघावयास मिळत आहे.

Race-3 Trailer Out: Exploding Storm Action! | Race-3 Trailer Out : श्वास रोखणाऱ्या तुफान अ‍ॅक्शनचा धमाका!

Race-3 Trailer Out : श्वास रोखणाऱ्या तुफान अ‍ॅक्शनचा धमाका!

googlenewsNext
मान खान, बॉबी देओल आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या बहुप्रतिक्षित ‘रेस-३’ चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना ज्या दृश्यांची अपेक्षा होती, काहीसे तसेच दृश्य ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत बघावयास मिळतात. तुफान अ‍ॅक्शन सीन्समध्ये ज्या पद्धतीने ग्लॅमरचा तडका दाखविण्यात आला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद म्हणावा लागेल. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर बघण्यासाठी लोकांमध्ये सकाळपासूनच उत्सुकता होती, तर दुसरीकडे ज्या पद्धतीने सलमान खान सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची उत्सुकता वाढवित आहे, त्यावरून ट्रेलर केव्हा प्रदर्शित केला जाईल, असा प्रश्न अनेकांच्या मुखी होता. 

ट्रेलरविषयी सांगायचे झाल्यास, सुरुवातच एका जबरदस्त डायलॉगने होते. हा डायलॉग दुसºया कोणाचा नसून, सलमान म्हणजेच सिकंदरचा असतो. सलमान ट्रेलरच्या सुरुवातीला हे म्हणताना दिसतो की, ‘ये रेस जिंदगी की रेस हंै किसी की जिंदगी लेकर ही खत्म होगी।’ त्यानंतर ताबडतोब बंदुकीच्या गोळ्यांनी वार करताना दिसतो. पुढे लगेचच सिकंदरचा पुन्हा एक डॉयलॉग ऐकावयास मिळतो. ‘परिवार के लिए अगर किसी की जान भी लेनी पड़े तब भी हम पिछे नहीं हटते है।’ ट्रेलर जसजसा पुढे बघत जाल तसतसे चित्रपटातील एकाएका पात्रांची एंट्री तुम्हाला बघावयास मिळेल. 



ट्रेलरमध्ये प्रत्येक पात्राची एंट्री कुठल्या ना कुठल्या डायलॉगने सुरू होते. ज्यावरून हे स्पष्ट होते की, अखेर त्यांचा उद्देश काय आहे? ट्रेलरमध्ये सलमान खान व्यतिरिक्त डेजी शाह आणि जॅकलीन फर्नांडिसही तुफान अ‍ॅक्शन सीन्स देताना बघावयास मिळतात. त्याचबरोबर पुन्हा एकदा सलमान आणि जॅकलीनमधील जबरदस्त केमिस्ट्रीही बघावयास मिळते. ट्रेलरमध्ये जॅकलीनच्या अदा कमी बघावयास मिळतात, मात्र तिचा ग्लॅमर अवतार बघून एक गोष्ट स्पष्ट होते की, ती पुन्हा एकदा करोडो चाहत्यांना आपलेसे करणार आहे. 

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा याने केले आहे. या अगोदर रेमोने ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी-२’चे दिग्दर्शन केले आहे. त्याचा हा चित्रपट याच वर्षी ईदनिमित्त १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ट्रेलरला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून, आता चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतीक्षा लागली आहे. 

Web Title: Race-3 Trailer Out: Exploding Storm Action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.