'भारत'नंतर प्रियांका चोप्रा दिसणार 'या' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 10:31 AM2018-07-09T10:31:49+5:302018-07-09T10:44:51+5:30

गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा आपला बॉयफ्रेंड निक जोनसला घेऊन चर्चेत आहे. तसेच प्रियांकाच व्हॅकेशन संपले आहे.

Priyanka Chopra will appear after 'India' or ' | 'भारत'नंतर प्रियांका चोप्रा दिसणार 'या' सिनेमात

'भारत'नंतर प्रियांका चोप्रा दिसणार 'या' सिनेमात

googlenewsNext
ठळक मुद्देमीडिया रिपोर्टनुसार यासिनेमात प्रियांका चोप्राच्या अपोझिट फरहान अख्तर दिसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा आपला बॉयफ्रेंड निक जोनसला घेऊन चर्चेत आहे. तसेच प्रियांकाच व्हॅकेशन संपले आहे. लवकरच प्रियांका 17 जुलैपासून अली अब्बास जफरच्या भारतचे शूटिंग सुरु करणार आहे. ऐवढेच नाहीतर प्रियांका याव्यतिरिक्त काही सिनेमाचे स्क्रिप्टसुद्धा वाचतेय आणि एका सिनेमाची स्क्रिप्टदेखील तिने फायनल केली आहे. 

 

गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की, 'मारग्रेटा विदा ए स्ट्रॉ' दिग्दर्शित सोनाली बोस आपल्या आगामी सिनेमासाठी प्रियांका चोप्राला साईन करण्याची इच्छा आहे. आता मिळत असलेल्या माहितीनुसार प्रियांकाने हा सिनेमा साईनदेखील केला आहे.प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे जो याचे संकेत देतो आहे की प्रियांकाने हा सिनेमा साईन केला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार यासिनेमात प्रियांका चोप्राच्या अपोझिट फरहान अख्तर दिसणार आहे. सिनेमाची कथा आयशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित आहे. याची शूटिंग ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणार आहे. यात जायरा वसीम आयशाची भूमिका साकारणार आहे. 

प्रिायांकाच्या भारतबाबत बोलयाचे झाले तर, भारतमध्ये सलमान खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान 'भारत'मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक  वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. यात त्याच्या बहिणीची भूमिका दिशा पटानी साकारणार आहे. 

 

Web Title: Priyanka Chopra will appear after 'India' or '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.