एकेकाळी तुषार कपूर करिना कपूर खानवर करायचा जीवापाड प्रेम..मात्र का आली त्याच्यावर भाऊ बनण्याची वेळ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 10:05 AM2017-09-18T10:05:50+5:302017-09-18T16:02:21+5:30
अभिनेता तुषार आणि करिना कपूर खान यांची मैत्री ही जग जाहीर. ऐवढेच नाही तर दोघांनी मुलं सुद्धा एकाच नर्सरीत ...
अ िनेता तुषार आणि करिना कपूर खान यांची मैत्री ही जग जाहीर. ऐवढेच नाही तर दोघांनी मुलं सुद्धा एकाच नर्सरीत जातात. नुकताच करिनाचा मुलगा तैमूर आणि तुषार मुलगा लक्ष्य यांचा नर्सरीत एकमेकांच्या बाजूला बसलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला होता. तुषार आणि करिनाने चित्रपटातदेखील एकत्र काम केले आहे. 2001मध्ये पहिल्यांदा 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटात एकत्र दिसले होते. सतीश कौशिकच्या या चित्रपटात तुषारने एका करण नावाच्या मुलाची भूमिका साकारली होती जो पूजाच्या (करिना कपूर) बघताच क्षणी प्रेमात पडतो. ही तर झाली चित्रपटाची गोष्ट मात्र खऱ्या आयुष्यात ही तुषार करिनाच्या प्रेमात पडला होता. ऐवढचे नाही तर तुषारला करिनाशी लग्नसुद्धा करायच होते. करिना मात्र तुषारला आपला फक्त एक चांगला मित्र मानत होती. 2008 मध्ये आलेल्या चित्रपट गोलमाल रिटर्नमध्ये तुषारने करिनाच्या भावाची भूमिका साकारली होती. ज्या मुलीशी तुषारची लग्न करायची इच्छा होती तिला रोहित शेट्टीमुळे त्याला बहिण बनवण्याची वेळ आली. 2001 च्या दरम्यान जेव्हा करिना तुषारसोबत जीना सिर्फ मेरे लिए चित्रपटाचे शूटिंग करत होती त्यावेळी तिचे नाव ह्रतिक रोशनसोबत जोडले गेले होते. त्यानंतर ही तुषारच्या मनातले बेबो बद्दलचे प्रेम जराही कमी झाले नाही.
ALSO READ : करिना कपूरचा मुलगा तैमुर अली खान आणि तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य कपूरची जमली गट्टी
एकत्र दोन फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर करिनाने आपल्या करिअरला संभाळले. मात्र तुषार कपूरचे करिअर अप होऊच शकले नाही. एक इंटरव्ह्यु दरम्यान तुषाराला त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांने आपल्याला लग्नासाठी करिना कपूरसारखी मुलगी हवी असल्याचे सांगितले होते. करिना आणि तुषार आजही एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिण आहेत. करिना सैफ अली खानसोबत लग्न करुन आपल्या वैवाहिक आयुष्यात खुश आहे तसेच ती तैमूर नावाच्या बाळाची आईसुद्धा आहे. तर तुषार सरोगसी पद्धतीने बाबा बनला आहे. त्याचा मुलगा लक्ष्य जवळपास दीड वर्षांचा झाला आहे. मात्र तो अजूनही बॅचलर आहे.