मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना या अभिनेत्याला कुणीच ओळखले नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 07:09 AM2018-02-21T07:09:46+5:302018-02-21T12:39:46+5:30

रणबीर कपूर सध्या आपला आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान रणबीर आपला सह-कलाकार हुसैन दलालसोबत मुंबईतल्या रस्त्यांवर ...

Nobody knew the actor on the streets of Mumbai? | मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना या अभिनेत्याला कुणीच ओळखले नाही ?

मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना या अभिनेत्याला कुणीच ओळखले नाही ?

googlenewsNext
बीर कपूर सध्या आपला आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान रणबीर आपला सह-कलाकार हुसैन दलालसोबत मुंबईतल्या रस्त्यांवर बाईक राईड केले. मात्र यावेळी आश्चर्याची गोष्ट अशी की रणबीर फिरताना कोणीच ओळखले नाही. ना चाहत्यांनी गरडा घातला, ना ऑटोग्राफसाठी लाईन लागली. मुंबईतल्या भेंडीबाजारमध्ये रणबीर रेकी करण्यासाठी गेला होता. यावेळी रणबीरने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावला होता. हुसैनना बाईक राईडचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. रणबीरसोबत एक्टिवावर फिरणं खरचं एडव्हेंचर होते.  



रणबीर लवकरच आलियासोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. आलिया आणि रणबीर या चित्रपटासाठी इस्राईलला जाऊन आले तिथे जाऊन त्यांनी ह्या चित्रपटाचा अभ्यास त्यांनी केला. 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट विज्ञानवर आधारित आहे. ज्यात रणबीर एका सुपरहिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात आलिया, रणबीरसह अमिताभ बच्चन आणमि मौनी रॉयची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.  याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. हा चित्रपट अॅक्शनपट असून ह्यात आलिया आणि रणबीर भरपूर अॅक्शन करताना दिसणार आहेत. आयन मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट प्राचीन इतिहासतील गोष्टीवर आधारित आहे.  



तसेच रणबीरचा संजूबाबाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘संजू’ ठेवण्यात आहे. चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजूबाबाची भूमिका साकारणार आहे. त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.  रिपोर्टनुसार, चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त हेदेखील गेस्ट अपियरेंस करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटाला विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करीत आहेत. चित्रपट २९ जून २०१८ मध्ये प्रदर्शित केला जाईल. स्वत: राजकुमार हिरानी यांनीच ट्विट करून याबाबतची घोषणा केली आहे.

ALSO READ :  ​रणबीर कपूरच्या अफेअर्समुळे वैतागले ऋषी कपूर! विचारला असा बेधडक सवाल!!


 

Web Title: Nobody knew the actor on the streets of Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.