​#MeToo: महिलाच नाही तर पुरूषांनीही दिली होती ‘सेक्स’ची आॅफर ; इरफान खानचा धक्कादायक खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 08:14 AM2017-10-26T08:14:46+5:302017-10-26T13:47:51+5:30

लैंगिक शोषणाविरोधात सोशल मीडियावर ‘मी टू’ या हॅशटॅगसह सुरू करण्यात आलेल्या मोहिमेनंतर जगभरातील सिनेकलाकार लैंगिक शोषणाच्या घटनेविरोधात उघडपणे बोलत ...

#MeToo: Women did not have the same sex but men gave 'sex'; Irfan Khan's shocking disclosure !! | ​#MeToo: महिलाच नाही तर पुरूषांनीही दिली होती ‘सेक्स’ची आॅफर ; इरफान खानचा धक्कादायक खुलासा!!

​#MeToo: महिलाच नाही तर पुरूषांनीही दिली होती ‘सेक्स’ची आॅफर ; इरफान खानचा धक्कादायक खुलासा!!

googlenewsNext
ंगिक शोषणाविरोधात सोशल मीडियावर ‘मी टू’ या हॅशटॅगसह सुरू करण्यात आलेल्या मोहिमेनंतर जगभरातील सिनेकलाकार लैंगिक शोषणाच्या घटनेविरोधात उघडपणे बोलत आहेत. कल्की कोच्लिन, रिचा चड्ढा, विद्या बालन, मल्किाक्का दुआ या सगळ्या अभिनेत्रींसह आता अभिनेतेही या मुद्यावर उघडपणे बोलताना दिसत आहेत.  होय, अभिनेता इरफान खान याने यासंदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘करीब करीब सिंगल’ या आपल्या आगामी सिनेमाच्या म्युझिक लॉन्चप्रसंगी इरफान यावर बेधडक बोलला. इरफानच्या मते, ‘बिग बॉयज क्लब’ बॉलिवूड आणि भारतात सर्वत्र आहे. तुझ्या  लैंगिक शोषणाचा प्रयत्न कधी झाला का? असा प्रश्न इरफानला विचारला गेला. यावर  इरफानने ‘हो’ असे उत्तर दिले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ‘होय, आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वासनांध लोक आहेत. सुरूवातीच्या दिवसांत मलाही अनेकांकडून ‘कॉम्प्रोमाईज’ची आॅफर मिळाली होती. पण माझा या गोष्टीला ठाम नकार होता. मला सेक्ससाठी अनेकदा विचारणा झाली. महिलांच नाहीत तर पुरूषांनीही मला आॅफर दिली. हा माझा एकट्याचा अनुभव नाही. हा इथल्या अनेकांचा अनुभव आहे. माझ्या मते, ही गोष्ट प्रत्येक इंडस्ट्रीत होते. केवळ बॉलिवूड वा हॉलिवूडचं नाही तर प्रत्येक इंडस्ट्रीत. ज्यांना तुम्ही ओळखता, ज्यांचा तुम्ही आदर करता अशा लोकांकडून अशी आॅफर मिळणे खरेच विचित्र होते. पण याला नकार देणे केवळ आणि केवळ माझ्या हातात होते,’ असे इरफान यावेळी म्हणाला. पुरूषांपेक्षा महिलांना ‘कॉम्प्रोमाईज’साठी अधिक विचारणा होते, असे एक निरीक्षणही त्याने यावेळी नोंदवले.

ALSO READ; #MeToo : ‘मी १४ वर्षांची होती अन् तो ३६ वर्षांचा होता’, प्रियंका चोपडाच्या को-अ‍ॅक्ट्रेसनी केला लैंगिक शोषणाचा खुलासा!

गेल्या काही दिवसांपासून जगभरातील माध्यमांमध्ये हॉलिवूड निर्माते हार्वी वीनस्टीन यांचे प्रकरण  गाजतेय. हॉलिवूडमधल्या अनेक बड्या अभिनेत्रींनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. महिलांवर होणा-या लैंगिक अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.अनेक महिला आहेत ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहे पण याविषयी ते खुलेपणाने बोलू शकत किंवा न्याय मागू शकत नाही. अशा महिलांनी सोशल मीडियावर #MeToo हॅशटॅग वापरून ट्विट वा फेसबुकवर स्टेटस अपलोड करावं असे आव्हान हॉलिवूड अभिनेत्रींनी केले आहे. त्यांच्या या मोहिमेला जगभरातून तुफान प्रतिसाद लाभला आहे. भारतातही ट्विटवर #MeToo  हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 

Web Title: #MeToo: Women did not have the same sex but men gave 'sex'; Irfan Khan's shocking disclosure !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.