​पाहा, करण जोहरच्या जुळ्यांचा एक सुंदर फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 08:15 AM2017-07-18T08:15:59+5:302017-07-18T13:45:59+5:30

बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या जुळ्या मुलांचा फोटो तुम्ही पाहिलातं? नसेल पाहिला तर ​पाहाच. करणने रुही आणि यश या आपल्या जुळ्या मुलांचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

Look, a beautiful photo of Karan Johar's match! | ​पाहा, करण जोहरच्या जुळ्यांचा एक सुंदर फोटो!

​पाहा, करण जोहरच्या जुळ्यांचा एक सुंदर फोटो!

googlenewsNext
लिवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या जुळ्या मुलांचा फोटो तुम्ही पाहिलातं? नसेल पाहिला तर बघाच. करणने रुही आणि यश या आपल्या जुळ्या मुलांचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. आयफा अवार्डसाठी गेलेला करण सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. तीन दिवसांचा आयफा सोहळा सरला पण कदातिच करणचा न्यूयॉर्कमधील मुक्काम वाढला. मग अशात आपल्या काळजाच्या तुकड्यांची आठवण तर होणारच ना? रूही व यशच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या करणने आपल्या  भावना व्यक्त करत यश आणि रुहीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत यश व रूहीचे केवळ हातावर हात दिसतात. ‘माझ्या बाळांच्या आठवणीने मी व्याकूळ झालोय,’ असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. हा फोटो तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला नक्की कळवा. खरे तर हा फोटो म्हणजे,यश व रूहीची नुसती एक झलक आहे. लवकरच करण आपल्या गोंडस बाळाचे पूर्ण फोटोही शेअर करेल, अशी आशा करूयात.



याच वर्षी करणने सरोगसीद्वारे त्याच्या जुळ्या मुलांना जन्म दिला.   सोशल मीडियावरून जुळ्या मुलांचा बाप झाल्याचे करणने जाहीर केले होते. मी एक चांगला बाप बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार.   माझ्या आयुष्यात रूही आणि यश या जुळ्या गोंडस मुलांना प्रवेश केला आहे.  वयाच्या ४४ वर्षी मेडिकल सायन्सच्या मदतीने मी बाप बनू शकलो. हे माझे सगळ्यांत मोठे ब्लॉकबस्टर आहे. सध्या सतत मी त्यांना न्याहाळत बसतो. मी दोन मुलांचा बाप झालोय, यावर माझा स्वत:चाच विश्वास बसत नाही. या दोन चिमुकल्या जीवांनी माझ्या आयुष्यातील एकटेपणा दूर केला, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Web Title: Look, a beautiful photo of Karan Johar's match!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.