'परमाणु'च्या सक्सेसनंतर जॉन अब्राहमने सुरु केली 'या' चित्रपटाची शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 09:21 AM2018-06-16T09:21:19+5:302018-06-16T14:51:19+5:30

जॉन अब्राहम परमाणु बॉक्स ऑफिसवर हिट झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 58 कोटींच्यावर कमाई केली आहे. यानंतर जॉनने ...

John Abraham started the shooting of 'This' movie after 'Nuclear''s release | 'परमाणु'च्या सक्सेसनंतर जॉन अब्राहमने सुरु केली 'या' चित्रपटाची शूटिंग

'परमाणु'च्या सक्सेसनंतर जॉन अब्राहमने सुरु केली 'या' चित्रपटाची शूटिंग

googlenewsNext
न अब्राहम परमाणु बॉक्स ऑफिसवर हिट झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 58 कोटींच्यावर कमाई केली आहे. यानंतर जॉनने आता आपल्या आगामी चित्रपट 'रोमिया अकबर वाल्टर'ची शूटिंग देखील सुरु केली आहे. 



जॉनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला जॉनने कॅप्शनसुद्धा दिले आहे, ''यापद्धतीने झाली एका नव्या प्रवासाची सुरुवात.'' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जॉनने परमाणूचे निर्माते अजय कपूरसोबत हातमिळवणी केली आहे. अजय कपूर म्हणतात, या चित्रपटात जॉन आमच्या टीमचा हिस्सा बनला आहे या गोष्टीचा मला आनंद आहे. या चित्रपटाची कथा 1970च्या दशकातील आहे. आम्ही या चित्रपटाची शूटिंग सुरु होण्याची मोठ्या उत्सुकतेने वा़ पाहत होतो.  रोब्बी ग्रेवालने या चित्रपटाची कथा लिखिली आहे. रोमियो अकबर वाल्टरची निर्मिती धीरज वर्धवन, अजय कपूर, वनेस्सा वालिया आणि गॅरी ग्रेवाल करणार आहेत.  या चित्रपटात जॉन अब्राहम अभिनेत्री मौनी रॉयसुद्धा दिसणार आहे. मौनी अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. रिलीजच्या आधीच मौनीला बॉलिवूडमध्ये लॉटरी लागली असल्याचे दिसतेय. 

ALSO READ :  जॉन अब्राहमचा खुलासा, ‘माझ्यात आणि अक्षयमध्ये कुठलेही भांडण नाही’

परमाणू या चित्रपटाने जॉनच्या करिअरला पुन्हा एकदा उभारी मिळाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परमाणूची कथा  १९९८ मधील पोखरणमध्ये करण्यात आलेल्या परमाणू परीक्षण चाचणीवर आधारित आहे. जॉन अब्राहम  व्यतिरिक्त डायना पॅँटी हिची मुख्य भूमिका होती. ‘परमाणू’ चित्रपटाची शूटिंग साडेतीन महिन्यांतच पूर्ण करण्यात आली. या चित्रपटाला बोमन ईरानी आणि अभिषेक शर्मा यांनी दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून, त्यातील पात्र काल्पनिक होती. या चित्रपटाने रिलीजनंतर आतापर्यंत 60 कोटींची कमाई केली आहे. 

Web Title: John Abraham started the shooting of 'This' movie after 'Nuclear''s release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.