​जान्हवी कपूरने जिम ट्रेनरसोबत केली धम्माल मस्ती! पाहा व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 09:47 AM2017-12-19T09:47:15+5:302017-12-19T15:17:15+5:30

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर लवकरच ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. या डेब्यूसाठी जान्हवीची जोरदार तयारी सुरु आहे.

Janhavi Kapoor with Jim Trainer Kelly Dhammal fun! Watch video !! | ​जान्हवी कपूरने जिम ट्रेनरसोबत केली धम्माल मस्ती! पाहा व्हिडिओ!!

​जान्हवी कपूरने जिम ट्रेनरसोबत केली धम्माल मस्ती! पाहा व्हिडिओ!!

googlenewsNext
रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर लवकरच ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. या डेब्यूसाठी जान्हवीची जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे पहिल्या-वहिल्या चित्रपटाचे शूटींग आणि दुसरीकडे स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममधील वर्कआऊट, असे सगळे जान्हवी करतेय. अर्थात या सगळ्यात मस्ती तर बनतेच. 



सध्या जिममध्ये घाम गाळत असलेल्या जान्हवीच्या फॅन क्लबने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत जान्हवी केवळ पाच मिनिटात 6 पॅक एब्ज बनवण्याच्या टीप्स देताना दिसतेय. काही तासांत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पहिल्या ३० सेकंदात प्लांक्स करा आणि पुढच्या ३० सेकंदात टीजर करा, असे जान्हवी सुचवतेय. पुढचे वर्कआऊट नी एब्स आणि यानंतर क्रॉस क्रंचेज करायचेय. या संपूर्ण व्हिडिओत जान्हवी आणि तिच्या ट्रेनरला जाम मस्ती करताना तुम्ही पाहू शकता.
‘धडक’ हा चित्रपट ‘सैराट’ या सुपरडुपर हिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, असे सांगण्यात येतेय. पण ‘धडकची कथा  ‘सैराट’पेक्षा बरीच वेगळी असेल, असे म्हटले जातेयं.  ‘सैराट’अतिशय साधारण पद्धतीने बनवण्यात आला होता. पण ‘धडकमध्ये मात्र ग्लॅमरचा तडका लावण्यात येणार आहे. आपल्या मुलीचे ग्रॅण्ड लॉन्चिंग व्हावे, असे श्रीदेवी व बोनी कपूर यांचे मत आहे. त्यामुळेच कदाचित करणने  ‘सैराट’च्या स्क्रिप्टमध्ये बरेच बदल केले आहेत.

ALSO READ : OMG ! शूटींगच्या पहिल्याच दिवशी श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने ओढवून घेतला दिग्दर्शकाचा संताप!!

सूत्रांचे मानाल तर, ‘धडक’मध्ये मुलीच्या आईची एक लहानशी पण तितकीच महत्त्वाची भूमिका आहे.   या आईच्या भूमिकेच्या चौकटीत श्रीदेवी अगदी फिट बसते. त्यामुळेच या चित्रपटात श्रीदेवी आपल्या लेकीच्याच ‘रिल मदर’ची भूमिका साकारताना दिसू शकते. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनअंतर्गत तयार होणारा हा चित्रपट शशांक खेतान दिग्दर्शित करणार आहे. सूत्रांच्या मते, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी करणने शशांकवर सोपवली, यामागे एक खास कारण आहे. शशांतला लहान शहरातील प्रेमाची चांगली जाण आहे, असे करणचे मत आहे.  यापूर्वी धर्मा प्रॉडक्शनसाठी ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ आणि ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’ या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन शशांकनेच केले होते. हे दोन्ही चित्रपट कमालीचे यशस्वी ठरले होते. त्यामुळेच ‘धडक’ची जबाबदारीही शशांकच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

Web Title: Janhavi Kapoor with Jim Trainer Kelly Dhammal fun! Watch video !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.