​साडी नेसता येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...! फॅशन डिझाईनर सब्यसाची मुखर्जीचे वादग्रस्त विधान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 07:14 AM2018-02-13T07:14:20+5:302018-02-13T12:45:23+5:30

लोकप्रीय फॅशन डिझाईनर सब्यसाची मुखर्जी कायम त्याच्या कलेक्शनसाठी चर्चेत असतो. पण आता मात्र तो एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला ...

If you do not have sari nesata, you should feel ashamed ...! Fiction designer Sabyasachi Mukherjee's controversial statement !! | ​साडी नेसता येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...! फॅशन डिझाईनर सब्यसाची मुखर्जीचे वादग्रस्त विधान!!

​साडी नेसता येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...! फॅशन डिझाईनर सब्यसाची मुखर्जीचे वादग्रस्त विधान!!

googlenewsNext
कप्रीय फॅशन डिझाईनर सब्यसाची मुखर्जी कायम त्याच्या कलेक्शनसाठी चर्चेत असतो. पण आता मात्र तो एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. होय, पाश्चात्य कपड्यांना पसंती देणाºया तरूणींवर सब्यसाची याने टीका केली आहे.  साडी नेसता येत नसेल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे सब्यसाचीने म्हटलेय.  
हावर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये सब्यसाची बोलत होता. साडी ही आपली संस्कृती आहे. जगातील सगळ्यांत सुंदर पोशाख आहे. प्रत्येक महिलेने सांस्कृतिक संचित असलेला हा पोशाख आपलासा करायलाच हवा. मला साडी नेसता येत नाही, असे एखाद्या मुलीने मला येऊन सांगितले तर हे सांगताना तुला लाज वाटत नाही का, असेच मी तिला सुनावेल, असे सब्यसाची यावेळी म्हणाला.   आजच्या तरूणाईनेही आपली संस्कृती जपजी पाहिले. आजच्या मुलींच्या मनात साडीबद्दल अनेक पूर्वग्रह आहेत. साडी नेसणे, त्यात वावरणे कठीण आहे, म्हणून साडी न नेसण्याकडे तरूण मुलींचा कल आहे. पण हीच साडी नेसून आपल्या भारतातील अनेक महिलांनी युद्ध लढली आहेत, याचाही विचार व्हायला हवा, असेही सब्यसाची म्हणाला.
सब्यसाचीचा हा युक्तिवाद काहींना योग्य वाटत असला तरी काहींनी मात्र सब्यसाचीच्या या टीकेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अनेक महिलांनी याबद्दल सब्यसाचीला आडव्या हाताने घेतले आहे. एका महिलेने सब्यसाची चक्क ‘अलविदा’ म्हटले आहे. ‘सब्यसाची, किती उथळ बोललास. रेकॉर्डसाठी सांगते की, मला नाही माहित की साडी कशी नेसतात’, असे तिने लिहिलेय. अन्य एका प्रियांका नामक तरूणीने ‘सब्यसाची, तुला लाज वाटायला हवी. संस्कृतीच्या नावावर महिलांना कमी लेखणारा आणखी  एक जण,’ असे तिने लिहिले आहे. सुप्रसिद्ध कॉमेडियन तन्मय भट्ट यानेही सब्यसाचीच्या या टीकेला उत्तर दिले आहे. ‘तू साडी ८० हजारांत विकतो, म्हणून कदाचित महिला ती नेसत नाहीत,’ अशा उपरोधिक शब्दांत त्याने सब्यसाचीला उत्तर दिले आहे.

ALSO READ : SEE PICS : ‘पद्मावत’पेक्षाही सुंदर आहे दीपिका पादुकोणचा हा नवा अंदाज!!

सब्यसाची हा बॉलिवूड अभिनेत्रीचा आवडता फॅशन डिझाईनर आहे. अनुष्का शर्माने तिच्या लग्नात सब्यसाचीचेचं कलेकशन कॅरी केले होते. अलीकडे सब्यसाचीने साड्यांचे नवे कलेक्शन सादर केले होते. यासाठी दीपिका पादुकोणने फोटोशूट केले होते.

Web Title: If you do not have sari nesata, you should feel ashamed ...! Fiction designer Sabyasachi Mukherjee's controversial statement !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.