हनी सिंगच्या 'रंगतारी' गाण्याला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 03:06 PM2018-09-17T15:06:19+5:302018-09-17T15:11:36+5:30

प्रसिद्ध पॉप सिंगर यो यो हनी सिंगच्या 'रंगतारी' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर काही कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सलमान खान प्रोडक्शन्सचा आगामी चित्रपट 'लवरात्री'मध्ये हे गाणे पाहायला मिळणार आहे.

Honey Singh's 'Rangartari' song become popular | हनी सिंगच्या 'रंगतारी' गाण्याला मिळतेय पसंती

हनी सिंगच्या 'रंगतारी' गाण्याला मिळतेय पसंती

googlenewsNext
ठळक मुद्दे'रंगतारी' गाण्यात आयुष शर्माचा दमदार डान्स'रंगतारी' गाण्याला मिळतेय प्रेक्षकांची पसंती


यो यो म्हणत तरूणाईला आपल्या तालावर थिरकायला लावणारा प्रसिद्ध पॉप सिंगर यो यो हनी सिंगच्या 'रंगतारी' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर काही कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सलमान खान प्रोडक्शन्सचा आगामी चित्रपट 'लवरात्री'मध्ये हे गाणे पाहायला मिळणार आहे. 'रंगतारी' या गाण्याला हजारो चाहत्यांची पसंती मिळत असून या गाण्याला पाच दिवसांत १२ मिलियनहून अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे.


'लवरात्री' चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या 'रंगतारी' या गाण्याने हॉलीवूड गायक कान्या वेस्ट आणि मारून यांना पिछाडीवर टाकत यूट्यूबवर २४ तासांच्या आत सर्वाधिक पाहिले गेलेल्या गाण्याचा किताब आपल्या नावे केला आहे. याबाबतची घोषणा करताना संगीत निर्माता, गायक, संगीतकार आणि रॅपरने लिहिले की, जगातील पहिल्या नंबरचे गाणे हे 'लवरात्री'मधील 'रंगतारी' हे आहे. या यशाबद्‌दल आनंद व्यक्‍त करत हनी सिंग म्हणाला की,' ही बाब माझ्यासाठी निश्‍चित कौतुकास्पद आहे. मी केलेल्या परिश्रमाला यश मिळाल्याने मी समाधानी आहे.'


'रंगतारी' गाण्यात आयुष शर्माचा दमदार डान्स पाहायला मिळतो आहे. या गाण्याला देव नेगीने स्वरसाज दिला आहे. या गाण्याचे रॅप हनी सिंगचे आहे. हे गाणे शब्बीर अहमद यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. लवरात्री चित्रपटात सलमान खान केमिओ करताना दिसणार आहे. तर अरबाज खान व सोहेल खान पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती सलमान खान फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. अभिराज मीनावालाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Honey Singh's 'Rangartari' song become popular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.