या कारणामुळे मैंने प्यार किया या चित्रपटात सलमान खानचे नाव ठेवण्यात आले प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:34 PM2019-03-04T12:34:09+5:302019-03-04T12:43:30+5:30

मैंने प्यार किया हा चित्रपट सलमानच्या कारकिर्दीतील पहिला हिट चित्रपट असून या चित्रपटाद्वारे त्याने नायक म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरज बडजात्या होते.

Here's How Sooraj Barjatya Came Up With Salman Khan's Iconic Screen Name 'Prem' in maine pyar kiya | या कारणामुळे मैंने प्यार किया या चित्रपटात सलमान खानचे नाव ठेवण्यात आले प्रेम

या कारणामुळे मैंने प्यार किया या चित्रपटात सलमान खानचे नाव ठेवण्यात आले प्रेम

googlenewsNext
ठळक मुद्देराजश्री प्रोडक्शनचा दुल्हन वही जो पिया मन भाये हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात प्रेम किशन हे मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव देखील प्रेम होते. या चित्रपटाप्रमाणेच मैंने प्यार किया हा चित्रपट देखील हिट होईल असा विचार करून आम्ही प्रेम हे नाव ठेवण्याचे ठरवले.

सलमान खान आणि प्रेम हे एक समीकरणच बनले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये त्याचे नवा प्रेम असल्याचेच आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या प्रेम या नावाची सुरुवात त्याच्या मैंने प्यार किया या चित्रपटापासूनच झाली. मैंने प्यार किया हा चित्रपट सलमानच्या कारकिर्दीतील पहिला हिट चित्रपट असून या चित्रपटाद्वारे त्याने नायक म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरज बडजात्या होते.

मैंने प्यार किया या चित्रपटाच्या यशानंतर सलमानचे प्रेम हे नाव आपल्याला बडजात्या यांच्या हम आपके है कौन, हम साथ साथ है या चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळाले. बडजात्या कुटुंबियांचे प्रेम हे नाव आवडते आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल. कारण मैं प्रेम की दिवानी हूँ आणि विवाह या चित्रपटात सलमान खान नसला तरी या चित्रपटातील नायकांचे नाव हे प्रेमच होते. 

प्रेम या नावासोबत बडजात्या कुटुंबियांचे काय नाते आहे याविषयी नुकतेच सुरज बडजात्या यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले आहे. ते सांगतात, प्रेम हे नाव संस्कार मूल्य असलेल्या, कुटुंबियांच्या अतिशय जवळ असलेल्या आणि मनाने अतिशय स्वच्छ असणाऱ्या मुलाला योग्य वाटते असे माझे म्हणणे आहे. मैंने प्यार किया या चित्रपटाच्या वेळी आम्ही राज, प्रताप, गौरव अशा अनेक नावांचा विचार केला होता आणि त्यावेळी शाहरुख खानचे कोणत्याच चित्रपटात नाव राज नव्हते. त्यामुळे हे नाव देखील व्यक्तिरेखेला ठेवण्याचा आमचा विचार सुरू होता. पण राजश्री प्रोडक्शनचा दुल्हन वही जो पिया मन भाये हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात प्रेम किशन हे मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव देखील प्रेम होते. या चित्रपटाप्रमाणेच मैंने प्यार किया हा चित्रपट देखील हिट होईल असा विचार करून आम्ही प्रेम हे नाव ठेवण्याचे ठरवले.

राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटात नेहमीच एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळते. याविषयी ते सांगतात, मी एकत्रित कुटुंबात लहानाचा मोठा झालो आहे आणि आजही आम्ही एकत्र राहतो. त्याचमुळे मी वयाच्या केवळ २५ व्या वर्षी हम आपके है कौन सारखा चित्रपट बनवू शकलो. 

 

Web Title: Here's How Sooraj Barjatya Came Up With Salman Khan's Iconic Screen Name 'Prem' in maine pyar kiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.