​अखेर बिपाशा बासू व करण सिंह ग्रोव्हरची होणार वापसी! विक्रम भट्ट यांनी लिहिलीय चित्रपटाची कथा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 12:29 PM2018-05-29T12:29:02+5:302018-05-29T17:59:02+5:30

 बिपाशा बासू व करण सिंह ग्रोव्हर हे दोघेही बॉलिवूडचे सर्वाधिक रोमॅन्टिक कपल आहे. पण ‘अलोन’ या चित्रपटानंतर  या रोमॅन्टिक ...

Finally Bipasha Basu and Karan Singh will be returning to Grover! Story of the film written by Vikram Bhatt !! | ​अखेर बिपाशा बासू व करण सिंह ग्रोव्हरची होणार वापसी! विक्रम भट्ट यांनी लिहिलीय चित्रपटाची कथा!!

​अखेर बिपाशा बासू व करण सिंह ग्रोव्हरची होणार वापसी! विक्रम भट्ट यांनी लिहिलीय चित्रपटाची कथा!!

googlenewsNext
 
िपाशा बासू व करण सिंह ग्रोव्हर हे दोघेही बॉलिवूडचे सर्वाधिक रोमॅन्टिक कपल आहे. पण ‘अलोन’ या चित्रपटानंतर  या रोमॅन्टिक कपलच्या हाताला काम नाहीय. खरे तर लग्नाआधी बिपाशाची बॉलिवूडमध्ये नाही म्हणायला ब-यापैकी चलती होती. पण लग्नानंतर अचानक बिपाशा मागे पडली. काहींच्या मते, लग्नानंतर काही  निमार्ते - दिग्दर्शक बिपाशाकडे आॅफर घेऊन गेलेत. पण बिपाशाने म्हणे, स्वत:सोबत हबी करणलाही कास्ट करावे, अशी अट त्यांच्यापुढे ठेवली. मग काय, बिपाशाही नको अन करणही नको म्हणून पुढे बिप्सला आॅफर्स मिळणेचं बंद झाले. तेव्हापासून बिप्स व करण दोघांकडेही काम नव्हते. पण आता या ‘मंकी लव्हर्स’ला (बिप्स व करणला  मंकी लव्हर्स  म्हणून ओळखले जाते.) एक प्रोजेक्ट मिळालाय. होय, या दोघांनी एक चित्रपट साईन केल्याचे कळतेय. ताजी बातमी खरी मानाल तर ‘आदत’ या चित्रपटात बिपाशा व करण एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा विक्रम भट्ट यांनी लिहिलेय. म्हणजेच एकंदर काय तर लग्नानंतर पहिल्यांदा बिप्स व करण कुण्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटींगही सुरु झाल्याचे कळतेय.

also read : बिपाशा-करणचा दिसला रोमॅण्टिक अंदाज; पाहा व्हिडीओ!

काही दिवसांपूर्वी हे मंकी लव्हर्स एक टीव्ही शो होस्ट करणार अशी बातमी होती. यानंतर बिपाशा गायक मिका सिंहच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर वापसी करणार, अशी बातमी आली. पण आता मंकी लव्हर्सच्या मोठ्या पडद्यावरील वापसीच्या बातमीवर मोहोर लागली आहे. भूषण पटेल हा चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याचे कळतेय. भूषण यांनी २०१५ मध्ये आलेला बिप्स व करणचा ‘अलोन’ दिग्दर्शित केला होता. 
 

Web Title: Finally Bipasha Basu and Karan Singh will be returning to Grover! Story of the film written by Vikram Bhatt !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.