‘डॉन’च्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानच्या मनात दुसºयांदा लग्न करण्याचा आला होता विचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 03:33 PM2017-10-25T15:33:14+5:302017-10-25T21:03:14+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान फिल्मी लाइफमध्येच नव्हे तर वास्तविक जीवनातही रोमॅण्टिक आहे. शाहरुखचे पत्नी गौरीवर तेव्हा प्रेम जडले होते ...

During the shooting of 'Don', Shah Rukh Khan thought to have got married for the second time! | ‘डॉन’च्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानच्या मनात दुसºयांदा लग्न करण्याचा आला होता विचार!

‘डॉन’च्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानच्या मनात दुसºयांदा लग्न करण्याचा आला होता विचार!

googlenewsNext
लिवूडचा किंग शाहरुख खान फिल्मी लाइफमध्येच नव्हे तर वास्तविक जीवनातही रोमॅण्टिक आहे. शाहरुखचे पत्नी गौरीवर तेव्हा प्रेम जडले होते जेव्हा त्याने बॉलिवूडमध्ये त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. शाहरुख खान आणि गौरी खान आज बॉलिवूडमधील हॅप्पी कपलपैकी एक आहेत. लग्नाला २६ वर्षं उलटूनदेखील त्यांच्यातील प्रेम तसुभरही कमी झालेले नाही. आजही दोघांमध्ये पहिल्यासारखे प्रेम आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की, शाहरुखवर गौरीसोबत दुसºयांदा लग्न करण्याची वेळ उद्भवली होती? 

खरं तर सुरुवातीलाच मोठ्या प्रयत्नाने शाहरुखने गौरीसोबत लग्न केले. आता दुसºयांदा त्याच्यावर गौरीसोबत लग्न करण्याची वेळ उद्भवल्याने त्याचे काय हाल झाले असते याचा विचार करणेही अवघडच म्हणावे लागेल. मात्र अखेरीस सर्व काही ठीक झाले. मात्र आता तुम्ही असा विचार करीत असाल की, अखेर असे काय घडले की शाहरुखला गौरीसोबत दुसºयांदा लग्न करण्याची वेळ आली होती? वास्तविक शाहरुख त्याच्या लग्नाची निशाणी म्हणजेच वेडिंग रिंग हरवून बसला होता. 



टाइम्स आॅफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, त्यावेळी शाहरुख खान त्याच्या ‘डॉन’ या चित्रपटाची शूटिंग करीत होता. फरहान अख्तर याच्या दिग्दर्शनाखाली बनविण्यात आलेला हा चित्रपट २००६ मध्ये रिलीज झाला. याच दरम्यान त्याच्यावर दुसºयांदा लग्न करण्याचा प्रसंग ओढावला होता. वास्तविक शाहरुखचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता. मात्र ही बाब फारच कमी लोकांना माहिती आहे की, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या लग्नाची अंगठी हरवली होती. जेव्हा ही बाब त्याच्या लक्षात आली तेव्हा त्याने सेटवरील सर्वांनाच अंगठी शोधण्याचे काम लावले होते. तो वारंवार सेटवरील लोकांना सांगत होता की, माझी अंगठी शोधा अन्यथा मला गौरीसोबत दुसºयांदा लग्न करावे लागेल. 

Web Title: During the shooting of 'Don', Shah Rukh Khan thought to have got married for the second time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.