बेडरूम ते सिटिंग एरियापर्यंत, आतून आहे लग्जीरियस; पाहा ‘रेस-३’च्या ‘या’ अभिनेत्रीच्या घराचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 03:13 PM2018-06-17T15:13:28+5:302018-06-17T20:43:28+5:30

बहुप्रतिक्षित ‘रेस-३’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर २९ कोटी रूपयांची कमाई करीत यावर्षी सर्वाधिक ओपनिंग करणाºया चित्रपटाचा किताब ...

From the bedroom to the seating area, inside is Lazierius; See 'photo of the actress' house of Race-3! | बेडरूम ते सिटिंग एरियापर्यंत, आतून आहे लग्जीरियस; पाहा ‘रेस-३’च्या ‘या’ अभिनेत्रीच्या घराचे फोटो!

बेडरूम ते सिटिंग एरियापर्यंत, आतून आहे लग्जीरियस; पाहा ‘रेस-३’च्या ‘या’ अभिनेत्रीच्या घराचे फोटो!

googlenewsNext
ुप्रतिक्षित ‘रेस-३’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर २९ कोटी रूपयांची कमाई करीत यावर्षी सर्वाधिक ओपनिंग करणाºया चित्रपटाचा किताब आपल्या नावे केला आहे. सुपरस्टार सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी जरी नाकारले असले तरी, प्रेक्षकांचा मात्र जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. याचदरम्यान, चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या जॅकलीन फर्नांडिसने तिच्या घराच्या इंटिरियरमध्ये काही बदल केला असून, त्याबाबतचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. 







किंग शाहरूख खानची पत्नी गौरीने खास इंटिरियर डिझाइन केले आहे. गौरीने जॅकलीनच्या मुंबईमधील अपार्टमेंटचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे. गौरीने केलेल्या बदलामुळे हे जॅकलीनचे घर खूपच लग्जीरियस दिसत आहे. गौरीने जॅकलीनच्या घराचा मेकओवर केल्यानंतर त्याचे काही इनसाइट फोटोज् आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये बेडरूमपासून ते सिटिंग एरिया बघावयास मिळत आहे. घराचा बहुतेक भाग खूप सुंदर असून, डिझाइनमुळे त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. 







गौरीने हे फोटो शेअर करताना लिहिले की, जॅकलीनच्या अपार्टमेंटमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच चांगला राहिला आहे. याठिकाणी खूपच पॉझिटीव्ह एनर्जी आहे. जसे कोणी आपल्या आउटफिट, डिफरेंट शूज, बॅग, स्कार्फ, बेल्टने आपला लूक बदलतो अगदी काहीसे तसेच याठिकाणचे कुशन, वॉल पेपर्स आणि फंकी आर्ट वर्कने काम करून घराचे मेकओव्हर करण्यात आले आहे. दरम्यान, गौरीने या अगोदर, करिना कपूर-खान, सोनम कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, रणबीर कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या घराचे इंटिरियर डिझाइनचे काम केले आहे. 

Web Title: From the bedroom to the seating area, inside is Lazierius; See 'photo of the actress' house of Race-3!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.