‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’च्या ‘अम्मी’ची बातच न्यारी,ग्लॅमरस अदा पाहून तुम्हीही म्हणाल हीच का ‘ती’?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 07:13 AM2018-01-06T07:13:50+5:302018-01-06T12:43:50+5:30

बॉलिवूडमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही.कुणाचं नशिब चमकेल,कुणी रातोरात स्टार बनेल किंवा कुणी क्षणात खाली आपटेल हे सांगणं ...

'Bajrangi Bhaijaan' Munni's 'Ammi' talk about 'Dada' and 'Woman', you would have said that 'she'? | ‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’च्या ‘अम्मी’ची बातच न्यारी,ग्लॅमरस अदा पाहून तुम्हीही म्हणाल हीच का ‘ती’?

‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’च्या ‘अम्मी’ची बातच न्यारी,ग्लॅमरस अदा पाहून तुम्हीही म्हणाल हीच का ‘ती’?

googlenewsNext
लिवूडमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही.कुणाचं नशिब चमकेल,कुणी रातोरात स्टार बनेल किंवा कुणी क्षणात खाली आपटेल हे सांगणं अशक्य आहे.हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बड्या कलाकारांना सारेच ओळखतात.त्यांचे सिनेमा,त्यांची भूमिका प्रत्येक फॅनला माहिती असते.आता बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा सगळ्यांनीच पाहिला असेल.या सिनेमातील भाईजान सा-यांनाच भावला असेल. हा सिनेमा भाईजान आणि मुन्नीवर आधारित होता.असं असलं तरी इतर कलाकारही तितकेच महत्त्वाचे होते. त्यांची भूमिका छोटीशी असली तरी ती विशेष होती.या सिनेमात मुन्नीसह तिची अम्मीही होती.मुन्नीच्या या अम्मीची सा-यांनीच रुपेरी पडद्यावर झलक पाहिली आहे.प्रत्यक्षात मात्र ही अम्मी रिल दुनियेपेक्षा कितीतरी वेगळी आहे.याच अम्मीची ओळख आम्ही तुम्हाला करुन देणार आहोत.मुन्नीच्या अम्मीची भूमिका साकारणा-या या अभिनेत्रीचं नाव मेहर विज असं आहे.दिल्लीत जन्म झालेल्या मेहरने आजवर सिनेमात ब-याच छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत.'नो टाईम फॉर लव','दिल विल प्यार व्यार' अशा सिनेमात तिने सहकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.छोट्या पडद्यावरही मेहरने भूमिका साकारल्या आहेत.'राम मिलायें जोडी','किस देश में है मेरा दिल' अशा मालिकांमध्येही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली.छोट्या छोट्या मात्र लक्षवेधी भूमिका साकारणारी मेहर रिअल लाइफमध्ये भलतीच ग्लॅमरस आहे.तिच्या सौंदर्यावर रसिक फिदा झाले नाही तरच नवल.त्यामुळेच की काय अभिनेता मानव विजसुद्धा मेहरकडून क्लीन बोल्ड झाला.मेहर आणि मानव काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले.प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे ही मेहरची खासियत आहे.याशिवाय मजामस्करी करणंही तिला तितकंच भावतं.तिचा हाच स्वभाव तिच्या फोटोंमध्येही पाहायला मिळतो.केवळ दबंग सलमान खानच नाही तर आणखी एका खानसह मेहरने काम केले आहे. नुकतंच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची भूमिका असलेल्या 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमातही ती झळकली होती.



 

Web Title: 'Bajrangi Bhaijaan' Munni's 'Ammi' talk about 'Dada' and 'Woman', you would have said that 'she'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.