प्रभास पुन्हा एकदा बनला ‘बाहुबली’! वाढले इतके वजन की ओळखणेही झाले कठीण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 03:48 PM2018-11-20T15:48:48+5:302018-11-20T15:49:35+5:30

अलीकडे प्रभास ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस एस राजमौली यांचा आगामी चित्रपट ‘आरआरआर’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये दिसला. पण या इव्हेंटमध्ये प्रभासचा बदललेला लूक पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

baahubali fame prabhas look change see pics | प्रभास पुन्हा एकदा बनला ‘बाहुबली’! वाढले इतके वजन की ओळखणेही झाले कठीण!!

प्रभास पुन्हा एकदा बनला ‘बाहुबली’! वाढले इतके वजन की ओळखणेही झाले कठीण!!

googlenewsNext

‘बाहुबली’ या चित्रपटाने जगभर लोकप्रीय होणारा साऊथ सुपरस्टार सध्या ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. स्वभावाने अतिशय लाजरा प्रभास फार कमी इव्हेंटला हजेरी लावतो. पण ज्या कुठल्या इव्हेंटला जातो, तिथे आपली छाप सोडतो. अलीकडे प्रभास ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस एस राजमौली यांचा आगामी चित्रपट ‘आरआरआर’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये दिसला. पण या इव्हेंटमध्ये प्रभासचा बदललेला लूक पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. होय, यावेळी प्रभासचे वजन बरेच वाढलेले दिसले. अगदी ‘बाहुबली’साठी वाढलेल्या वजनाइतके. ‘बाहुबली’साठी प्रभासने बरेच वजन वाढवले होते. पण यानंतर ‘साहो’साठी त्याला वजन घटवावे लागले होते. मात्र आता प्रभासने पुन्हा एकदा वजन वाढवले आहे.



‘साहो’नंतर प्रभास लगेच दिग्दर्शक के के राधा कृष्ण कुमार यांच्या चित्रपटात दिसणार आहे. कदाचित याच चित्रपटासाठी प्रभासने वजन वाढवले असावे, असा अंदाज आहे. . हा चित्रपट युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करणार आहे.



या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अभिनेत्री पूजा हेगडेची वर्णी लागली आहे. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होणार आहे. या चित्रपटाच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण लवकरच या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल सुरू होणार आहे.



 

खुद्द प्रभासने आपल्या सोशल अकाऊंटवर याची घोषणा केली होती. युरोपच्या पार्श्वभूमीवर असलेला प्रभासचा हा आगामी चित्रपटही बिग बजेट चित्रपट असणार आहे.
‘साहो’बद्दल सांगायचे तर यात प्रभासशिवाय श्रद्धा कपूर,नील नितीन मुकेश, चंकी पांडे, मंदिरा बेदी असे अनेक कलाकार आहेत.
‘साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही दिसणार आहे. एमी जैक्सन, अरूण विजय आणि आदित्य श्रीवास्तव सारखे कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवणार आहेत.

Web Title: baahubali fame prabhas look change see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास