​श्री रेड्डीचा आणखी एक ‘धमाका’! इंटीमेट फोटोपाठोपाठ लीक केले ‘ private chat’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 06:07 AM2018-04-12T06:07:15+5:302018-04-12T11:37:15+5:30

मल्याळम व तेलगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने सध्या सगळीकडे खळबळ माजवली आहे. काही दिवसांपूर्वी तिने कास्टिंग काउचविरोधात भररस्त्यात टॉपलेस ...

Another 'blast' of Mr. Reddy! Intimate photos leaked back to 'private chat' !! | ​श्री रेड्डीचा आणखी एक ‘धमाका’! इंटीमेट फोटोपाठोपाठ लीक केले ‘ private chat’!!

​श्री रेड्डीचा आणखी एक ‘धमाका’! इंटीमेट फोटोपाठोपाठ लीक केले ‘ private chat’!!

googlenewsNext
्याळम व तेलगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने सध्या सगळीकडे खळबळ माजवली आहे. काही दिवसांपूर्वी तिने कास्टिंग काउचविरोधात भररस्त्यात टॉपलेस आंदोलन करत खळबळ उडवून दिली. काल तिने, प्रसिद्ध निर्माते सुरेश बाबू यांचा मुलगा अभिराम दग्गुबत्ती याच्यावर खळबळजनक आरोप केलेत. अभिराम हा ‘बाहुबली’ स्टार राणा दग्गुबत्तीचा भाऊ असल्याने श्री रेड्डीच्या या आरोपाने सगळ्यांनाच धक्का बसला. श्री रेड्डीने अभिरामसोबतचे काही फोटो लीक केलेत. यात अभिराम तिच्याशी अंगलट करताना दिसतोय. त्याने स्टुडिओमध्येच माझ्याशी सेक्स करण्यासाठी दबाव टाकला, असा आरोपही तिने केला. आता श्री रेड्डी आणखी एक असाच धक्कादायक खुलासा केला आहे. होय, आता तिने एका आणखी मोठ्या सेलिब्रिटीसोबतच्या सेक्स चॅटचे स्क्रीन शॉट लीक केले आहेत. हा सेलिब्रिटी म्हणजे, इंडियन आइडलचा विजेता श्रीराम. स्क्रीन शॉट शेअर करताना श्री रेड्डीने लिहिलेय की, हा आहे आपला इंडियन आइडल. लाज वाटायला हवी तुला. नावातले श्रीराम तुला शोभत नाही. तू त्या लायकीचा नाहीस.



श्री रेड्डीने लीक केलेले हे स्क्रिन शॉट्स सध्या वेगाने व्हायरल होत आहे. अर्थात या चॅटवरून हे सिद्ध होत नाही की, कुणी तिच्यावर शरीर संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला. यात वीवा हर्ष याचेही नाव आहे.


ALSO READ : Shocking : ‘बाहुबली’मधील ‘या’ अभिनेत्याच्या भावानेच केले श्री रेड्डीचे शोषण; लीक केले फोटो!

गत शनिवारी श्री रेड्डीने कास्टिंग काऊचविरोधात तेलगू फिल्म चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यालयाबाहेर टॉपलेस होत आंदोलन केले होते.  तेलगू इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या श्री रेड्डीने तेलगू फिल्म चेंबरकडे  कास्टिंग काउचबाबत तक्रार केली होती. पण फिल्म चेंबरने तिच्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली नाही. अखेर श्री रेड्डीने फिल्म चेंबरबाहेरचं कॅमे-यासमोर टॉपलेस होण्याचा निर्णय घेतला. कॅमे-यासमोर तिने कपडे उतरवणे सुरू केले. तिचे ते कृत्य पाहून सगळीकडे खळबळ माजली. काही क्षणात पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी श्री रेड्डीला तेथून बाजूला केले. यावेळी तिने कास्टिंग काउचमध्ये अडकलेल्या अनेक बड्या नावांचा खुलासा करण्याची धमकी दिली होती. तेलगू फिल्म इंडस्ट्री माझ्यासारख्या अभिनेत्रींना संधी नाकारली जाते. मला तेलगू फिल्म चेंबर आॅफ कॉमर्सचे सदस्यत्व हवे आहे. पण चेंबर मला सदस्यत्व देण्यास तयार नाही.मी काम मागितले की, न्यूड फोटो आणि व्हिडिओची मागणी केली जाते. केवळ ही मागणी पूर्ण करत नसल्याने मला संधी नाकारली जात आहे, असा आरोप श्री रेड्डीने यावेळी केला होता. 
सुमारे आठवडाभरापूर्वी श्री रेड्डीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एका दिग्गज तेलगू दिग्दर्शकावर आरोप केले होते. हा बडा दिग्दर्शक काही दिवसांपासून माझ्या घरासमोर घिरट्या घालत असल्याचे तिने म्हटले होते. शिवाय त्या दिग्दर्शकावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तो मला व्हिडिओ कॉल करायला सांगतो, असेही ती म्हणाली होती.

Web Title: Another 'blast' of Mr. Reddy! Intimate photos leaked back to 'private chat' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.