आणि मीरा राजपूतला दिसला शाहिद कपूरचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 09:44 AM2017-11-10T09:44:37+5:302017-11-10T15:14:37+5:30

बॉलिवूडमध्यल्या क्युट कपलपैकी एक जोडी आहे ती म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांची. मीरा आणि ...

And Meera Rajput looks like Shahid Kapoor's face | आणि मीरा राजपूतला दिसला शाहिद कपूरचा चेहरा

आणि मीरा राजपूतला दिसला शाहिद कपूरचा चेहरा

googlenewsNext
लिवूडमध्यल्या क्युट कपलपैकी एक जोडी आहे ती म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांची. मीरा आणि शाहिदची केमिस्ट्री बॉलिवूडमध्ये हिट आहे.  काही दिवसांपूर्वी दोघे ‘हॅलो’ मॅगझिनच्या कव्हरपेजवरसुद्धा झळकले होते.  लग्न झाल्यापासून सगळ्या ठिकाणी ही दोघे एकत्र हजेरी लावतात. या सेलिब्रिटी जोडीचे वैशिष्ट्य म्हणजे  बॉलिवूडशी दूर दूरपर्यंत संबंध नसताना मीराने शाहिदच्या करिअरशी जुळवून घेतलं. ऐवढेच नाही तर  तीसुद्धा या चित्रपटसृष्टीचा एक भाग झालेली दिसते. शाहिदच्या अनुपस्थितीतही बऱ्याच कार्यक्रमांना मोठ्या आत्मविश्वासाने ती एकटी हजेरी लावताना दिसते.

मीरा आयुष्यात आल्यानंतर ती तिच्या मागे सावलीसारखी उभी राहिली. अगदी चित्रपटाच्या शूटिंगपासून  ते अगदी कुटुंबाचा सांभाळ करण्यापर्यंत सर्व गोष्टीत मीरा संभाळून घेते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती शाहिदला सतत पाठिंबा देत असताना दिसते. पण, तुम्हाला हे माहिती आहे का, त्याच्या सतत बदलणाऱ्या लुक्समुळे कधीकधी मीरा संभ्रमात पडायची. कारण, शूटिंगमुळे म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणाने माध्यमांना टाळण्यासाठी शाहिद कपूर आपला चेहरा लपवायचा. यावेळी ‘पद्मावती’ चित्रपटातील त्याच्या राजाच्या भूमिकेसाठी  त्याला तसे करावे लागत होते.



ALSO READ :   SEE PICS: मॅगझिनच्या कव्हरपेजवर दिसली शाहिद कपूर अन् मीरा राजपूतची लाजवाब केमिस्ट्री! तुम्हीही व्हाल दंग!! 

चित्रपटातील आपला लूक रिवील होऊ नये म्हणून शाहिद कपूर मीडियापासून सतत आपला चेहरा लपवत होता. मात्र पद्मावतीचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झाल्यानंतर त्यांने आपल्या लूकसुद्धा रिव्हील केला आहे.  

शाहिदची पत्नी मीराने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाहिदचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला मीराने कॅप्शनदेखील दिले आहे. मी पुन्हा एकदा तुझा चेहरा पाहू शकतेय..
शाहिद कपूर पद्मावती शाहिद राजा रावल रतन सिंगच्या म्हणजेच राणी पद्मावतीच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पादुकोण राणी पद्मवातीच्या तर रणवीर सिंग अलाऊद्दीन खिल्जीच्या.  या चित्रपटासाठी शाहिद कपूरला 10 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.  राजा रावल रतन सिंगच्या भूमिकेसाठी त्यांने सहा प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. या चित्रपटाच्या रिलीजची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहतायेत. 

Web Title: And Meera Rajput looks like Shahid Kapoor's face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.