करिना कपूरबद्दल विचारताच जाम वैतागला अक्षय कुमार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 01:46 PM2018-06-05T13:46:42+5:302018-06-05T19:16:42+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार अलीकडे मीडयावर चांगलाच भडकला. कारण काय, तर करिना कपूर. होय, मीडियाने अक्षयला करिना कपूरबद्दल प्रश्न ...

Akshay kumar to ask about Kareena Kapoor! | करिना कपूरबद्दल विचारताच जाम वैतागला अक्षय कुमार!!

करिना कपूरबद्दल विचारताच जाम वैतागला अक्षय कुमार!!

googlenewsNext
लिवूडचा खिलाडी अक्षय कुमार अलीकडे मीडयावर चांगलाच भडकला. कारण काय, तर करिना कपूर. होय, मीडियाने अक्षयला करिना कपूरबद्दल प्रश्न विचारला अन् अक्षयचा संयम सुटला. करिनासोबत काम करण्यास तू किती उत्सूक आहेस, असा प्रश्न अक्षयला केला गेला होता. हा प्रश्न ऐकताच अक्षय काही वेळ शांत राहिला आणि मग अचानक प्रश्न विचारणा-यावर चवताळला. मी येथे स्वस्थ भारत अभिनयावर बोलायला आलो आहे आणि तू मला करिनाबद्दल विचारतोय. मी ज्या कामासाठी येथे आलोय, केवळ त्यावरचं बोला, असे अक्षय म्हणाला.  यादरम्यान मीडियाच्या  प्रश्नांमुळे अक्षय वैतागलेला  दिसला. एका पत्रकाराने तर कडीचं केली. तू रोज ८ वाजता झोपी जातोस नि आत्तातर घड्याळात 8.30 वाजलेत? असे तो अक्षयला उद्देशून म्हणाला. यावर ‘तुम बंद करोगे तभी मैं जाऊंगा और सोऊंगा ना,’ असे हजरतहजबाबी अक्षय या पत्रकारास म्हणाला.

ALSO READ : तब्बल 9 वर्षांनंतर करिना कपूर-अक्षय कुमार शेअर करणार स्क्रिन!

अक्षय कुमार आणि करिना कपूर तब्बल नऊ वर्षांनंतर चित्रपटसृष्टीतील हे दोन स्टार एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.   2009मध्ये आलेल्या कमबख्त इश्क या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. करण जोहर अक्षय कुमार आणि करिना कपूर यांना घेऊन चित्रपट तयार करतो आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात करिना कपूर आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या अपोझिट अक्षय कुमारला कास्ट करण्यात आले आहे. पण करिना कपूरशी या भूमिकेबाबत चर्चा सुरु आहे. करिनाला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे आणि लवकरच ती यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. यात करिना आणि अक्षयशिवाय आणखीन एक कपल दाखवले जाणार आहे. चित्रपटाच्या कथेबाबत बोलायचे झाले तर ती अजून स्पष्ट नाही झाली. 

Web Title: Akshay kumar to ask about Kareena Kapoor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.