कपिल शर्माच्या ट्वीटला अजय देवगणने दिले असे मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 02:58 PM2019-02-26T14:58:22+5:302019-02-26T15:02:20+5:30

अजयने नुकतीच सोशल मीडियावर कपिल शर्माची खिल्ली उडवली आहे. अजयच्या या ट्वीटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Ajay Devgn has a hilarious reply to Kapil Sharma as he congratulates him for the success of Total Dhamaal | कपिल शर्माच्या ट्वीटला अजय देवगणने दिले असे मजेशीर उत्तर

कपिल शर्माच्या ट्वीटला अजय देवगणने दिले असे मजेशीर उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देएक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून कपिलने टोटल धमालच्या टीमला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे आणि म्हटले आहे की, टोटल धमाल या चित्रपटाविषयी खूपच चांगल्या प्रतिक्रिया मला ऐकायला मिळत असून हा चित्रपट मी लवकरच पाहाणार आहे. कपिलने हे ट्वीट केल्यानंतर लगेचच अजय देवगणने कपिलला एक मजेशीर उत्तर दिले आहे. त्याने म्हटले आहे की, तू चित्रपट नक्कीच पाहा... आणि तू केवळ नेहमीच स्वतःच्या जोकवर हसत असतो. कधीतरी दुसऱ्यांनी केलेल्या जोकवर तरी हस...

अजय देवगण हा अतिशय मस्तीखोर असून तो कोणाचीही टर उडवण्याची एकही संधी सोडत नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. चित्रपटाच्या सेटवर तर त्याच्या या मस्तीखोर स्वभावामुळे त्याच्या सहकलाकारांना खूपच सावध राहावे लागते. त्याने नुकतीच सोशल मीडियावर कपिल शर्माची खिल्ली उडवली आहे. अजयच्या या ट्वीटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

अजय देवगणच्या टोटल धमाल या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले आहे. या चित्रपटाचे यश पाहाता कपिल शर्माने ट्विटरवरून या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी टोटल धमाल या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाची टीम द कपिल शर्मा शोमध्ये उपस्थित राहिली होती. यावेळी या चित्रपटाच्या टीमने खूपच मजा मस्ती केली होती. यावेळेचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून कपिलने टीमला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे आणि म्हटले आहे की, टोटल धमाल या चित्रपटाविषयी खूपच चांगल्या प्रतिक्रिया मला ऐकायला मिळत असून हा चित्रपट मी लवकरच पाहाणार आहे. त्याने या ट्वीटमध्ये अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख यांना टॅग केले आहे. 

कपिलने हे ट्वीट केल्यानंतर लगेचच अजय देवगणने कपिलला एक मजेशीर उत्तर दिले आहे. त्याने म्हटले आहे की, तू चित्रपट नक्कीच पाहा... आणि तू केवळ नेहमीच स्वतःच्या जोकवर हसत असतो. कधीतरी दुसऱ्यांनी केलेल्या जोकवर तरी हस...



 

'धमाल' चित्रपटाचा तिसरा भाग 'टोटल धमाल' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला असून कॉमेडी चित्रपटांमध्ये विकेंडला सगळ्यात जास्त कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे.

टोटल धमाल या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून त्यांचे आजवरचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. 
 

Web Title: Ajay Devgn has a hilarious reply to Kapil Sharma as he congratulates him for the success of Total Dhamaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.