एका फोन कॉलमुळे आमीर खानने घेतली हॉस्पिटलकडे धाव, वाचवले या व्यक्तीचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 05:54 PM2018-09-10T17:54:50+5:302018-09-10T17:56:46+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेताना दिसून येते. नुकतेच त्याने एका कृत्यातून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्याने केलेल्या कृत्याचे सोशल मीडियावर खूप कौतूक होत आहे.

Aamir Khan took a call from a phone call, went to the hospital, saved his life | एका फोन कॉलमुळे आमीर खानने घेतली हॉस्पिटलकडे धाव, वाचवले या व्यक्तीचे प्राण

एका फोन कॉलमुळे आमीर खानने घेतली हॉस्पिटलकडे धाव, वाचवले या व्यक्तीचे प्राण

googlenewsNext
ठळक मुद्देशजिथ कोयरी यांचे वाचवले आमीरने प्राणशजिथ कोयरी यांना आला होता अर्धांगवायूचा झटका सोशल मीडियावर होतंय आमीरचे कौतूक

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेताना दिसून येते. नुकतेच त्याने एका कृत्यातून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्याने केलेल्या कृत्याचे सोशल मीडियावर खूप कौतूक होत आहे. आमीरने दंगल चित्रपटाचा साऊंड इंजिनीयर शाजिथ कोयरी याला अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्याच्या मदतीसाठी मध्यरात्री घराबाहेर पडला.

‘दंगल’ चित्रपटासाठी साऊंड इंजीनिअर म्हणून काम केलेल्या शजिथ कोयरी यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. उपचारासाठी त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोयरी यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी बरीच वेळ वाट पाहिली. पण कोणतेच डॉक्टर तिथे न आल्यामुळे अखेर आमीर खानकडून मदत करण्यासाठी कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधला. आमीरला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तातडीने रुग्णालयात पोहचला. लीलावतीमधून कोयरी यांना कोकिलाबेन रुग्णालयात हलवले आणि तिथेच पुढील उपचार करण्यात आले. आमीरच्या या मदतीमुळे कोयरी यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर सोशल मीडियावर आमीरचे खूप कौतूक झाले.
बऱ्याचदा आमीर खूप प्रोफेशनल आहे असे बोलले जाते मात्र जेव्हा सामान्य माणसांची गोष्ट असते तेव्हा तो मदतीसाठी पुढाकार घेताना दिसतो. आमीर खान फक्त चित्रपटांसाठी ओळखला जात नाही तर माणूसकीसाठी देखील ओळखला जातो. तो नेहमी लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावतो आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करतो. पुन्हा एकदा कोयरी यांना मदत करून त्याने माणूसकी दाखवली आहे. खरेच आमीरचे हे कार्य कौतूकास्पद आहे.
 


 

 

Web Title: Aamir Khan took a call from a phone call, went to the hospital, saved his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.