200 वा वनडे सामना खेळणारा विराट जागतिक क्रिकेटमधील 71 वा क्रिकेटपटू

विराटच्या क्रिकेट करीयरमधील हा 200 वा एकदिवसीय सामना आहे. 200 वा वनडे सामना खेळणारा विराट जागतिक क्रिकेटमधील 71 वा क्रिकेटपटू आहे.

विराटने आतापर्यंत खेळलेल्या 199 वनडे सामन्यात 8767 धावा केल्या आहेत.

कोहलीने 199 सामन्यात 30 शतके आणि 45 अर्धशतके झळकावली आहेत.

कोहलीच्या नावावर 818 चौकार आणि 95 षटकार आहेत. शतकांमध्ये कोहली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगसोबत दुस-या स्थानावर आहे. पाँटिंगची सुद्धा 30 शतके आहेत पण त्यासाठी पाँटिंग 375 सामने खेळला.