सेहवागच्या 'बेबी सीटिंग' उडवली ऑस्ट्रेलियाची दैना

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले.

पेनने यष्टीमागे टिप्पणी करताना पंतला माझ्या मुलांना सांभाळणार का? असे विचारले होते. नंतरही हा सागा सुरूच आहे.

आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीने तयार केलीली जाहीरात सध्या व्हायरल होत आहे.

या जाहीरातीत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग बेबी सीटरच्या भूमिकेत दिसत आहे.

या व्हिडीओत सेहवाग ऑस्ट्रेलियाची जर्सी घातलेल्या लहान मुलांचे स्वागत आणि त्यांची देखभाल करताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गद फलंदाज मॅथ्यू हेडनला ही जाहीरात काही आवडली नाही.