सचिनला आवडतो वडापाव आणि पारले-जी बिस्कीट, वाचा त्याच्याविषयी इतर रंजक गोष्टी

१) ‘थर्ड अंपायर’ने बाद दिलेला सचिन हा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे.

२) १९९५ ला सचिन वेष बदलून ‘रोझा’ चित्रपट पाहायला गेला होता. पण, चष्मा आणि दाढी निघाल्याने लोकांनी त्याला ओळखलं आणि एकच गर्दी उसळली.

३) सचिन तेंडुलकरला मुंबईचा वडापाव आवडतो. शाळेत असताना मित्रांसोबत वडापाव खाण्याची शर्यतही लावत होता.

४) झिम्बाम्बे वगळता कसोटी खेळणाऱ्या प्रत्येक देशांविरोधात सचिन तेंडुलकरने शतक झळकावले आहे.

५) सर्वसामान्यांप्रमाणे सचिनलाही पारले-जी बिस्कीट चहात बुडवून चमच्याने खायला आवडते.

६) लांब कुरळ्या केसांमुळे शाळेत सचिनला चुकून मुलगी समजले गेले होते.

७) कपिल देवचा 100वा कसोटी सामना हा सचिन तेंडुलकरचा पदार्पणाचा सामना होता.

८) १९८८ साली सचिनने मादाम तुसाँ संग्रहालयाला पहिल्यांदा भेट दिली होती. त्यानंतर २० वर्षांत त्याच संग्रहालयात सचिनच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

९) संघासोबत प्रवास करताना सचिन बसमध्ये नेहमी पुढच्या सीटवर बसायचा.

१०) २४ वर्षाच्या कारकिर्दीत बीसीसीआयच्या एकाही बैठकीला किंवा सरावाला सचिन उशीरा पोहोचला नाही. त्यामुळे त्याला बीसीसीआयकडून एकदाही दंड किंवा शिक्षा झालेली नाही.