यंदाच्या मोसमात पाचवं शतक झळकवणारा मुंबईचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ

मुंबईचा टॅलेंटेड ओपनर पृथ्वी शॉ लवकरच राष्ट्रीय निवड समितीला आपली दखल घ्यायला भाग पाडणार आहे.

ग्रुप सी मध्ये शुक्रवारी आंध्रप्रदेश विरुद्धच्या सामन्यात खेळताना पृथ्वी शॉ ने 114 धावांची खेळी साकारली.

फर्स्ट क्लास क्रिकेट करीयरमधील पृथ्वीचे हे पाचवे शतक आहे. पृथ्वी शॉ फर्स्ट क्लासचे आतापर्यंत फक्त सात सामने खेळला आहे. त्यात त्याचे हे पाचवे शतक आहे.

पृथ्वी शॉ सर्वप्रथम नोव्हेंबर 2013 मध्ये चर्चेत आला. मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या हॅरिस शिल्डमध्ये त्याने एकटयाने 546 धावा फटकावण्याचा विक्रम केला होता.