7 एकर परिसरात बांधलं आहे एमएस धोनीचं फार्म हाऊस, बघा फोटो

टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत महेंद्र सिंग धोनी याला वरचं स्थान आहे. आयपीएल 2018 मध्ये चेन्नईला टीमला वयोवृद्धांची टीम म्हणून हिणावलं गेलं होतं. पण याच टीमने आयपीएलची ट्रॉफी मिळवली. आयपीएनंतर आता धोनी पत्नी साक्षी आणि आणि मुलगी जिवासोबत वेळ घालवत आहे. रांचीमध्ये धोनीचा 7 एकर परिसरात एक आलिशान फार्म हाऊस आहे. कैलाशपती असं या फार्म हाऊसचं नाव आहे चला बघूया या फार्म हाऊसचे खास फोटो....

महेंद्र सिंग धोनी याचं फार्म हाऊस फारच आलिशान आहे. धोनीने आपल्या फार्म हाऊसमध्ये नैसर्गिक सौंदर्याला अधिक महत्व दिलं आहे. टीम इंडियातील अनेक खेळाडूही इथे आल्यावर निसर्गाचा आनंद घेतात.ज्या शहरात धोनी लहानाचा मोठा झाला, ज्या शहरात धोनी क्रिकट लिजेंड बनला त्याच शहरात त्याने हा आलिशान फार्म हाऊस तयार केला. रांचीमधील रिंग रोडवर हे फार्म हाऊस उभारण्यात आलं आहे.

हा भव्य फार्म हाऊस उभारण्यासाठी तीन वर्ष लागलीत. झाडांबाबत धोनीचं असलेलं प्रेम या फार्म हाऊसमध्ये बघायला मिळतं. या फार्म हाऊसमध्ये सगळ्याच गोष्टी भव्य आणि शाही आहेत. या फार्म हाऊसमध्ये इंडोअर स्टेडिअम, स्वीमिंग पूल, प्रक्टीससाठी नेट मैदान, आधुनिक जिम आहे. हे फार्ण हाऊस धोनीच्या आधीच्या घरापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.

धोनीचं क्रिकेटमधील करिअर यशस्वी झाल्यानंतक त्याने आधीचं घर सोडून 2009 मध्ये हरमू रोडवर तीन मजली घर खरेदी केलं होतं. या घरात धोनी 8 वर्ष राहीला. 2017 मध्ये धोनी कैलाशपती फार्म हाऊसमध्ये शिफ्ट झाला.

धोनीने या फार्म हाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. त्यासोबतच लाकडं आणि मार्बलचा या फार्म हाऊसमध्ये खूपच सुंदरतेने करण्यात आला आहे. धोनीसाठी इथे खास पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

इथे फारच सुंदर बाग तयार करण्यात आलीये. याच बागेत धोनी आपल्या श्वानांना ट्रेनिंग देत असतो.

धोनीने आपले सुरुवातीचे दिवस एका लहानशा घरात घालवलं होतं. आज तो जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये गणला जातो. पण हे सगळं मिळवण्यासाठी त्याला लांब प्रवास करावा लागला आहे.