IPLमध्ये प्रथमच घडलं असं, 12 गुणांची कमाई करूनही SRH प्ले ऑफमध्ये

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रविवारी मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर अखेरच्या साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. या विजयाचा जितका आनंद मुंबईला झाला नसावा त्याहून अधिक आनंद सनरायझर्स हैदराबादला झाला. कारण, कोलकाताचा पराभव हा हैदराबादच्या पथ्यावर पडला आणि त्यांना प्ले ऑफमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच सर्व संघांनी 11 पेक्षा अधिक गुणांची कमाई केली आहे, असे प्रथमच घडले आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाने 7 पेक्षा कमी सामने जिंकूनही प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. आयपीएलमध्ये प्रथमच असे एखाद्या संघाने असा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

9 विजय मिळवूनही अव्वल स्थान पटकावण्यात अपयशी ठरणारा दिल्ली कॅपिटल्स हा पहिलाच संघ ठरला

सनरायझर्स हैदराबादने 12 गुणांची कमाई करूनही प्ले ऑफमध्ये स्थान कायम राखले. आयपीएल इतिहासात असे प्रथमच घडले आहे.

हैदराबाद, कोलकाता आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्या खात्यात प्रत्येकी 12 गुण होते, परंतु हैदराबादने ( 0.577) नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात यश मिळवले.