रोहित शर्माच्या या सेंच्युरीच्या खास गोष्टी एका क्लिकवर जाणून घ्या...

दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज आग ओकत असताना रोहितने संयमाने किल्ला लढवला.

शिखर धवन आणि विराट कोहली यांना जास्त धावा करता आल्या नाहीत. पण तरीही रोहित फटकेबाजी करत धावसंख्या वाढवत राहिला.

या सामन्यात रोहितचे दोन झेलही उडाले, पण त्यानंतरही डोकं शांत ठेवत रोहितने शतक साजरे केले.

सर्व दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा रोहितने चांगल्या पद्धतीने सामना केला.

रोहितचे हे विश्वचषकातील दुसरे शतक ठरले. यापूर्वी रोहितने 2015 साली झालेल्या विश्वचषकात शतक झळकावले होते.