IPL 2019 : आयपीएलमधला 'सिक्सर किंग' आहे तरी कोण, जाणून घ्या एका क्लिकवर...

आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार कोलकाता नाइट रायडर्सच्या आंद्रे रसेलच्या नावावर आहेत. रसेलच्या नावावर 52 षटकार आहेत.

षटकारांच्या बाबतीत मुंबई इंडियॉन्सचा हार्दिक पंड्या दुसऱ्या स्थानावर आहे. हार्दिकच्या नावावर 29 षटकार आहेत.

किंग्ज इलेव्हन पंजाबचा ख्रिस गेल या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. ख्रिस गेलच्या नावावर 32 षटकार आहेत.

सर्वाधिक षटकारांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एबी डी'व्हिलियर्स आहे. या हंगामात एबी डी'व्हिलियर्सने 26 षटकार लगावले आहेत.

सध्या ऑरेंज कॅप परीधान करणारा सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 21 षटकार आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतच्या नावावर 21 षटकार आहेत.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर 20 षटकार आहेत.