IPL 2019 : आयपीएलमध्ये खेळतानाही 'तो' देतोय बारावीची परीक्षा

दुर्गापूर येथे 25 ऑक्टोबर 2002 मध्ये प्रयास रे बर्मनचा जन्म झाला. त्याचे वडील कौशिक रे बर्मन हे डॉक्टर आहेत आणि ते प्रयासला नवी दिल्लीत घेऊन आले.

दक्षिण दिल्लीतल्या गार्गी कॉलेजमधील राम पाल क्रिकेट अकादमीतून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. पण, दुर्गापूर क्रिकेट केंद्रात त्यानं शिबनाथ रे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवले.

RCB नं ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर प्रयास बंगळुरूत राहायला आला, तेथे त्याची बहिण आयटी क्षेत्रात काम करते.

फिरकीपटू असलेला प्रयास हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न याचा चाहता आहे.

प्रयासला राहुल द्रविडचेही मार्गदर्शन लाभले आहे.

प्रयासला विराट कोहलीसह खेळायचे होते आणि त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.