गब्बरकडून विक्रमांचे 'शिखर' सर; कोहली, वीरूला टाकले मागे

शिखर धवन आणि रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला.

कोलकाता नाइट रायडर्सला परतीच्या लढतीतही दिल्लीला नमवता आले नाही. विजयासाठीचे 179 धावांचे लक्ष्य दिल्लीने 7 विकेट राखून पार केले.

दिल्लीला विजयासाठी 3 धावांची गरज असताना कॉलीन इंग्रामने खणखणीत षटकार खेचला आणि धवनला शतकाने हुलकावणी दिली.

धवनने 63 चेंडूत 11 चौकार व 2 षटकार खेचत नाबाद 97 धावा केल्या. आयपीएलमधील पहिल्या शतकापासून त्याला वंचित रहावे लागले. 

पण या विजयाबरोबर दिल्लीने 7 वर्षांचा दुष्काळ संपवला. 2012 नंतर दिल्लीने इडन गार्डन्सवर मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला.

इडन गार्डन्सवरील KKR विरूध्दची ही पाचवी सर्वोत्तम खेळी ठरली. या विक्रमात महेला जयवर्धने (110*), रोहित शर्मा ( 109*), ख्रिस गेल (102*) आणि रोहित शर्मा ( 98*) आघाडीवर आहेत.

धवनची ही आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी ठरली. याआधी 2011 मध्ये त्याने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध नाबाद 95 धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 90-100 धावांत नाबाद राहण्याचा पराक्रम धवनने केला. तीन वेळा त्याला शतकासमीप येऊनही त्याला वंचित रहावे लागले.

या विक्रमात त्याने वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, शेन वॉटसन आणि डेव्हिड वॉर्नर ( प्रत्येकी 2) यांना मागे टाकले