भारताने उडवला श्रीलंकेचा धुव्वा

कटक: भारताने पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या श्रीलंकेचा ९३ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारताने दिलेल्या 181 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 87 धावांत गारद झाला.

भारतीय संघाचा हा टी-20 च्या इतिहासातीस सर्वात मोठा विजय आहे.

भारताकडून यजुवेंद्र चहल आणि कुलदिप यादवनं मिळून आठ षटकांमध्ये 41 धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

हार्दिक पंड्याने 3 तर कुलदीप यादवने 2 बळी टिपत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

तसेच, यजुवेंद्र चहल चार विकेट घेत अफगाणिस्तानच्या रशीद याचा विक्रम मोडला. चहलने वर्षभरात 19 बळी घेतले आहेत. रशीदच्या नावावर वर्षभरात 17 बळी आहेत.

श्रीलंकेकडून दुष्मंथा चमीरा 12 (14), कुशल परेरा 19 (28), निरोशन डिकवेला, 13 (8) आणि उपुल थरंगा 23 (16) यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

श्रीलंकेने या सामन्यात 20 षटकांत 3 बाद 180 धावा करून लंकेपुढे विजयासाठी 181 धावांचे आव्हान ठेवले.