क्रिकेटचे नवे नियम उद्यापासून येणार अमलात, गैरवर्तन करणा-या खेळाडूंना बसणार चाप

बॅटच्या लांबी-रुंदीच्या मापात कोणताही बदल नाही. मात्र बॅटच्या कडांची जाडी ४० मिमीपेक्षा जास्त व मागील भागाच्या मधला फुगीरपणा ६७ मिमीपेक्षा जास्त असता कामा नये.

क्षेत्ररक्षकाने सीमारेषेवर हवेत उडी मारून झेल पकडण्यासाठी सीमारेषेच्या आतून उडी मारली असेल तरच तो झेल वैध मानला जाईल अन्यथा चेंडू सीमापार गेला असे मानून चौकार दिला जाईल.

पंचाला धमकावणे, त्याच्या अंगावर जाणे, धक्काबुक्की करणे आणि कोणावरही शारीरिक हल्ला करणे यासारखे बेशिस्त वर्तन ‘लेव्हल ४’ची बेशिस्त मानली जाईल व तसे करणा-या खेळाडूला पंच मैदानाबाहेर पाठवू शकेल.

कसोटी सामन्यात डावाचा खेळ ८० षटकांहून जास्त झाल्यानंतर पंचांचा निर्णयाचा ‘टॉप अप रिव्ह्यू’ मागता येणार नाही. ब) टी-२० सामन्यांमध्येही संघ ‘डीआरएस’चा वापर करू शकतील.

क्रीझच्या दिशेने धावणा-या किंवा झेप घेणा-या फलंदाजाची बॅट पॉपिंग क्रीझच्या आत टेकलेली असेल पण चेंडू प्रत्यक्ष यष्टीला लागताना त्याच्या शरीराचा जमिनीशी स्पर्श झालेला नसेल तरी त्याला धावचीत ठरविले जाणार नाही.