जगभरातील तरुणी ज्याच्यावर फिदा आहेत तो ‘बाहुबली’ प्रभास या बॉलिवूड अभिनेत्रीवर आहे फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 03:51 PM2017-12-09T15:51:44+5:302017-12-09T21:21:44+5:30

‘बाहुबली-२’च्या अफाट यशानंतर प्रभासच्या फॅन फॉलोइंगमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील कित्येक देशांमध्ये त्याचे ...

The world's most watched female stars are 'Bahubali' Prabhas, who is on Bollywood actress! | जगभरातील तरुणी ज्याच्यावर फिदा आहेत तो ‘बाहुबली’ प्रभास या बॉलिवूड अभिनेत्रीवर आहे फिदा!

जगभरातील तरुणी ज्याच्यावर फिदा आहेत तो ‘बाहुबली’ प्रभास या बॉलिवूड अभिनेत्रीवर आहे फिदा!

googlenewsNext
ाहुबली-२’च्या अफाट यशानंतर प्रभासच्या फॅन फॉलोइंगमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील कित्येक देशांमध्ये त्याचे चाहते आहेत. तरुणी तर त्याच्यावर अक्षरश: फिदा आहेत. प्रभासची एक झलक बघितली तर तरुणी त्यास खूप मोठी अ‍ॅचिव्हमेंट समजतात. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की, लाखो चाहते असलेला प्रभास एका बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रचंड चाहता आहे. होय, बाहुबली प्रभास या अभिनेत्रीवर अक्षरश: फिदा असून, तो तिला त्याचे पहिले क्रश समजतो. 

प्रभासने काही दिवसांपूर्वीच याबाबतचा खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, जेव्हा तो तारुण्यावस्थेत होता, तेव्हापासून तो अभिनेत्री रविना टंडनवर फिदा आहे. जेव्हा प्रभासने रविनाला मोठ्या स्क्रीनवर बघण्यास सुरुवात केली तेव्हापासूनच तो तिच्यावर फिदा झाला. काही दिवसांपूर्वीच ‘बाहुबली’चे नॉर्थ डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानी आणि अभिनेत्री रविना टंडन हैदराबाद येथे त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी गेले होते. जेव्हा याबाबतची माहिती प्रभासला मिळाली तेव्हा तो लगेचच रविनाला भेटण्यासाठी त्याठिकाणी गेला. यावेळी प्रभासने रविनासोबत एक फोटोही काढला. 



प्रभासने रविनाला सांगितले की, ‘मी तुझा खूप मोठा चाहता आहे. जेव्हा मी तुझे ‘अंदाज अपना अपना’मध्ये ‘एलो जी सनम’ हे गाणे बघतो तेव्हा माझ्या तोंडातून ‘वॉव’ असे शब्द निघतात.’ प्रभासच्या हे कौतुक शद्ब ऐकून रविना भलतीच प्रभावित झाली. रविनालादेखील प्रभासची भेट घेतल्यानंतर खूप आनंद झाला. यावेळी प्रभासने रविनासोबत काढलेला सेल्फी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 

Web Title: The world's most watched female stars are 'Bahubali' Prabhas, who is on Bollywood actress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.