video : फोटो देण्यास करिना कपूर खानने दिला नकार! कारण ऐकाल तर येईल हसू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 01:51 PM2018-06-19T13:51:17+5:302018-06-19T19:21:17+5:30

पुन्हा एकदा करिनाचे ग्लॅमरस लूक आठवण्याचे कारण म्हणजे, तिचा ताजा व्हिडिओ. या व्हिडिओत करिना फोटोग्राफरला पोझ देण्यास नकार देतेय. विशेष म्हणजे या नकाराचे कारण मोठे गोड आहे.

Video: Kareena Kapoor Khan refused to give a photo! Due to the pleasures will be heard !! | video : फोटो देण्यास करिना कपूर खानने दिला नकार! कारण ऐकाल तर येईल हसू!!

video : फोटो देण्यास करिना कपूर खानने दिला नकार! कारण ऐकाल तर येईल हसू!!

googlenewsNext
बो अर्थात करिना कपूर तिच्या स्टाईल आणि लूकसाठी ओळखली जाते. प्रेग्नंसीदरम्यान करिनाचे वजन वाढले होते. पण प्रसूतीनंतर सहाचं महिन्यात करिना पुन्हा एकदा आपल्या ग्लॅमरस लूकमध्ये परतली. जिममध्ये तासन तास मेहनत करत, कडक डाएट फॉलो करत तिने पुन्हा पूर्वीचे लूक मिळवले.  आता आम्हाला पुन्हा एकदा करिनाचे ग्लॅमरस लूक आठवण्याचे कारण म्हणजे, तिचा ताजा व्हिडिओ. या व्हिडिओत करिना फोटोग्राफरला पोझ देण्यास नकार देतेय. विशेष म्हणजे या नकाराचे कारण मोठे गोड आहे.




काही दिवस लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय केल्यानंतर करिना अगदी दोन दिवसांसाठी भारतात परतली. यादरम्यान ती तिचा मित्र मनीष मल्होत्राच्या घरी गेली. मनीषच्या घरातून बाहेर पडत असताना फोटाग्राफरनी तिचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला. तिला एक ग्रूप फोटो देण्याची विनंती केली गेली. पण करिनाने नकार दिला. का माहितीये, कारण तिने केसात तेल लावले होते. ‘नहीं, मैंने बाल में तेल डाला है...’ असे हसत हसत करिना म्हणाली आणि आपल्या गाडीत गेली. यावरून करिना तिच्या स्टाईल आणि लूकची किती काळजी घेते, याचा अंदाज आपल्याला येईल.

ALSO READ :   तैमूरला वेळ देण्याच्या प्रश्नावरून संतापली करिना कपूर; म्हटले, ‘मला दवंडी पिटण्याची गरज नाही’!

नुकताच करिनाचा ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर चांगली कमाई केली. यानंतरच्या करिनाच्या बॉलिवूड प्रोजेक्टबद्दल विचाराल तर मी वर्षातून केवळ एकच चित्रपट करेल, हे करिनाने आधीच स्पष्ट केलेय. याचे कारण म्हणजे, तिला अधिकाधिक वेळ मुलगा तैमूरला द्यायचा आहे.
मिस इंडिया पेजेंटमध्ये करिना परफॉर्म करणार आहे. यानंतर ती लगेच लंडनला परतणार आहे. जून महिन्याच्या शेवटी ती सैफ व मुलासोबत मुंबईत परतेल.
 

Web Title: Video: Kareena Kapoor Khan refused to give a photo! Due to the pleasures will be heard !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.