Kareena Kapoor furious over questions about timing for Timur; Said, 'I do not have to bowl'! | तैमूरला वेळ देण्याच्या प्रश्नावरून संतापली करिना कपूर; म्हटले, ‘मला दवंडी पिटण्याची गरज नाही’!
तैमूरला वेळ देण्याच्या प्रश्नावरून संतापली करिना कपूर; म्हटले, ‘मला दवंडी पिटण्याची गरज नाही’!
अभिनेत्री करिना कपूरचा कमबॅक चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला आहे. चित्रपटाने आतापर्यंत ७० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. चित्रपटाच्या यशाचे श्रेय करिना कपूर हिच्यासह तिच्या को-स्टार सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांना जातो. चौघींनीही चित्रपटात उत्कृष्ट काम केले असून, प्रमोशनमध्येही त्यांनी कुठलीच कसर सोडली नाही; मात्र यावरूनच सोशल मीडिया यूजर्स करिनावर निशाणा साधताना दिसत आहेत. त्यांच्या मते, करिना प्रमोशनमध्ये इतकी व्यस्त झाली होती की, तिने मुलगा तैमूरला वेळ देणे योग्य समजले नाही. यावरूनच ती एका मुलाखतीदरम्यान, सोशल मीडिया यूजर्सवर संतापताना दिसली. 

करिनाने मुलाखतीदरम्यान सांगितले की, मुलासोबत घालविलेला वेळ केवळ माझा आहे. यावरून मला सोशल मीडिया यूजर्सला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर जाहीरपणे यावर सांगण्याचीही गरज नाही. जर मी त्याच्यासोबत फोटो शेअर केला नाही किंवा विमानतळावर त्याला कडेवर घेऊन दिसली नाही तर याचा अर्थ असा होत नाही की, मी त्याला वेळ देत नाही. मी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर अधिक विश्वास ठेवते. मला दवंडी पिटवून याविषयी इतरांना सांगण्याची गरज नाही की, माझे अन् तैमूरचे नाते कसे आहे. खरं तर असे अजिबातच नाही की, काम करणाºया आई आपल्या मुलांना अजिबातच वेळ देत नाही. दरम्यान, करिनाने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, मी माझ्या मुलाचा सांभाळ नॉर्मल मुलांप्रमाणे करीत आहे; मात्र असे सांगतानाच तिने हेदेखील स्पष्ट केले की, आजच्या युगात हे शक्य नाही. तसेच याविषयी मी अधिक विचार करीत नसल्याचेही तिने स्पष्ट केले. एका इंग्रजी वेबसाइटशी बोलताना करिनाने सांगितले होते की, ‘जेव्हा मीडियाचे लोक तैमूरला बोलवितात तेव्हा तेदेखील रिअ‍ॅक्शन द्यायला लागतात. त्यावेळी ती परिस्थिती खूपच अवघड असते. आम्ही लोक हे सर्व कशा पद्धतीने मॅनेज करीत आहोत, हे आम्हालाच माहिती आहे. खरं तर आमची अशी इच्छा आहे की, तैमूरला पाच-पाच बॉडीगार्डच्या घेºयात ठेवले जाऊ नये. कारण आमचे लहानपण (करिना आणि सैफ) अशाप्रकारे अजिबातच गेले नाही. 
Web Title: Kareena Kapoor furious over questions about timing for Timur; Said, 'I do not have to bowl'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.