‘ती’च्यामुळे ऋतिक रोशन पुन्हा चर्चेत,कोण आहे ही ऋतिकच्या जीवनातली हॉट बाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 07:50 AM2018-01-06T07:50:06+5:302018-01-06T13:20:06+5:30

फराहचा फिटनेस पाहता ती ४७ वर्षांची आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

Hrithik Roshan again talked about 'She', who is Hrithik Roshan's life | ‘ती’च्यामुळे ऋतिक रोशन पुन्हा चर्चेत,कोण आहे ही ऋतिकच्या जीवनातली हॉट बाला

‘ती’च्यामुळे ऋतिक रोशन पुन्हा चर्चेत,कोण आहे ही ऋतिकच्या जीवनातली हॉट बाला

googlenewsNext
लिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात.मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट.ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात.आता असाच एक सेलिब्रिटी चर्चेत आला आहे, तो स्वतःमुळे नाही तर त्याच्या हॉट अॅड सेक्सी मेहुणीमुळे.गेल्या काही महिन्यांत सिनेमांपेक्षा पत्नी सुझानशी घेतलेला काडीमोड अन् बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतशी सुरु असलेल्या वादामुळे अभिनेता ऋतिक रोशन जास्त चर्चेत होता.मात्र आता तो आपल्या मेहुणीमुळे चर्चेत आला आहे. तुम्हाला विचार पडला असेल काय आहे इतकं खास त्याच्या मेहुणीत की इतकी चर्चा होऊ लागली आहे. त्याचं कारण आहे ऋतिकच्या मेहुणीचा सेक्सी,हॉट आणि बोल्ड अंदाज तसंच कुणालाही घायाळ करतील अशा मादक अदा. सध्या ऋतिकच्या मेहुणीचे हॉट फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.तिच्या मादक अदा सा-यांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.ऋतिकच्या मेहुणीचे नाव फराह अली खान असं आहे. गेल्या काही दिवसांत तिने स्वतःचे सेक्सी आणि बोल्ड अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर या फोटोंची आणि फराहची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. सोशल मीडियावर आपल्या मादक अदांचा जलवा दाखवणारी फराह एक फॅशन डिझायनर आहे आणि स्वतः तिने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ऋतिकची पत्नी सुझानची बहिण अशी फराहची ओळख. मात्र आपल्या बोल्ड फोटोंमुळे तिची आता नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे. एका फोटोत तर फराहने बिकीनी परिधान केली असून झाडाला लटकून झोके घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.फराहचा फिटनेस पाहता ती ४७ वर्षांची आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.आजवर तिने स्वतःचे ६००हून अधिक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 
 

 

Also Read:बॉडीगार्डसोबत ‘या’ स्टारला बघून घाबरला हृतिक रोशन; डोळ्यात आले होते अश्रू!

हृतिक रोशन त्याच्या एका चित्रपटाचे न्यूयॉर्क येथे शूटिंग करीत होता.शूटिंगदरम्यान एक दिवस हृतिक सकाळी सकाळी त्याच्या वेनेटी व्हॅनमध्ये बसलेला होता. तेव्हा अचानकच काही बाउन्सर त्याच्या वेनेटी व्हॅनमध्ये घुसले होते. अचानकच एवढे सगळे बाउन्सर त्याच्या वेनेटी व्हॅनमध्ये आल्याने हृतिक प्रचंड घाबरला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले होते. काही वेळानंतर पॉप स्टार मायकल जॅक्सन हृतिकच्या समोर येऊन उभा राहिला. हृतिक लहानपणापासूनच मायकल जॅक्सनच्या डान्स स्टेप फॉलो करीत आल्याने, त्याला मायकल जॅक्सनला भेटण्याची तीव्र इच्छा होती. अशाच दस्तुरखुद्द मायकल जॅक्सनच त्याच्या समोर आल्याने, हृतिकची अवस्था खूपच केविलवाणी झाली होती. 

Web Title: Hrithik Roshan again talked about 'She', who is Hrithik Roshan's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.