बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा भाऊ पुन्हा एकदा मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला. गेल्या बुधवारी अरबाज बांद्रा येथील एका रेस्टॉरंटबाहेर पडताना दिसला. याठिकाणी हे दोघे डिनर करण्यासाठी आले होते. आयटम गर्ल मलाइका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज सातत्याने या मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळत आहे. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, अरबाजला त्याचे नवे प्रेम तर मिळाले नाही ना? दरम्यान, ही मिस्ट्री गर्ल कोण आहे? याबाबतचा अद्यापपर्यंत उलगडा होऊ शकला नाही. अरबाज आणि मलाइकाचा घटस्फोट झाल्यानंतर हे दोघे आपल्या आयुष्यात पुढे जाण्याची धडपड करीत आहेत. अशात अरबाज नव्या प्रेमाच्या शोधात असून, तो सातत्याने या मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळत आहे. ३ जानेवारी रोजीही तो एका रेस्टॉरंटमध्ये या मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला. वास्तविक हे दोघे रेस्टॉरंटबाहेर एका पाठोपाठ आले. अगोदर अरबाज बाहेर आला. त्यानंतर काही वेळातच त्याची ही मिस्ट्री गर्ल आली. विशेष म्हणजे तेथून हे दोघे वेगवेगळ्या वाहनांनी त्यांच्या मार्गावर परतले. 

या दोघांना कैद करण्यासाठी जेव्हा कॅमेरे त्यांच्याकडे वळले तेव्हा मात्र त्यांची चांगलीच पंचाईत झाली. अरबाज लगेचच आपल्या कारमध्ये बसून निघून गेला. तर त्याची मिस्ट्री गर्ल चेहरा लपवित चक्क आॅटोरिक्षाने रवाना झाली. कॅमेºयांमुळे तिची एवढी धांदल झाली होती की, तिने लगेचच आॅटोरिक्षामध्ये बसून त्याठिकाणाहून पोबारा केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही मिस्ट्री गर्ल अरबाजची नवी गर्लफ्रेंड असावी. 

दरम्यान, अरबाजचा काही दिवसांपूर्वीच सनी लिओनी हिच्यासोबत ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नाही. सध्या अरबाज ‘दबंग-३’वर काम करीत आहे. 
Web Title: Arbaaz Khan, after seeing the hotel again with the Mystery Girl!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.