Join us  

'अग्गंबाई सूनबाई'मध्ये धक्कादायक वळण, आसावरी देणार सोहमला त्याच्या कृत्याची शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 1:11 PM

अग्गंबाई सूनबाईने या मालिकेत प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अग्गंबाई सूनबाईने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविले. या मालिकेत आता नवीन ट्विस्ट पहायला मिळणार आहे. अखेर आसावरीला सोहम आणि सुझैनच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजणार आहे आणि त्यानंतर आसावरी सोहमच्या विरोधात काय कृती करते, हे पहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अग्गंबाई सूनबाई मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पहायला मिळते आहे की सोहम शुभ्राला सांगतोय की कालपर्यंत माझे होते हे ऑफिस आणि आता मला माझ्याच केबिनमध्ये जाता येत नाही. बघतो कोण अडवतो मला. त्यावर शुभ्रा त्याला रोखत म्हणते की तुझे केबिन आईने लॉक केलंय आणि तुला ऐकावच लागेल. मला कोणीही अडवू शकत नाही म्हणत सोहम शुभ्राला ढकलून देतो. तितक्यात आसावरीची एन्ट्री होते आणि सोहम असा रागाने आवाज देत त्याला आणि सुझैनला या कंपनीत जागा नाही आणि त्यांना काढून टाकले आहे, असे सांगते.

हा प्रोमो शेअर करत कॅप्शन दिले की, आसावरी देऊ शकेल का सोहमला त्याच्या कृत्यांची शिक्षा? २८ जून रात्री ८.३० वाजता हा भाग प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.'अग्गंबाई सूनबाई' ही मालिका सुरू झाल्यापासून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम आणि आजोबा या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांच्यावर सर्वजण भरभरून प्रेम करत आहेत.

या मालिकेच्या नवीन पर्वामध्ये आसावरीने सर्व घराची सूत्र हाती घेतली असून सोहम तिचा राईट हॅन्ड झाला आहे. तर अभिजीत राजे यांनी स्वतःहून सर्व घरची जबाबदारी स्वीकारली आहे. 

टॅग्स :अग्गंबाई सूनबाईझी मराठी