Join us
Daily Top 2Weekly Top 5

झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; तिच्या जागेवर सुरू होणार ही नवीन मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 16:23 IST

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका लवकरच संपणार असल्याचे समजते आहे.

झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायला (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) आता रंगात आलेली असतानाच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते आहे. या मालिकेच्या जागी एक नवीन मालिका सुरू होणार आहे. मालिका संपत असल्याचे समजल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. 

 येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेमध्ये आता ओम आणि स्वीटू यांचे लग्न देखील झाले आहे. त्यामुळे या मालिकेमध्ये रंगतदार वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. लग्न झाल्यामुळे प्रेक्षक खूपच खूश आहेत. सध्या मालिकेत त्या दोघांचा रोमान्स पाहायला मिळतो आहे. तर दुसरीकडे मालविका सुधरली नसून अद्याप ती ओम आणि स्वीटू यांच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत ओम आणि स्वीटू एका पार्टीत डान्स करताना दिसत आहे. हे पाहून मालविकाला राग अनावर झाला आणि एका मुलीशी हुज्जत घालून तिला धक्का मारत मारत ती स्वीटूला धक्का मारून स्विमिंग पूलमध्ये ढकलते. ओमला मालविकावर कसा रिअॅक्ट करतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आता संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षक देखील नाराज होण्याची शक्यता आहे. त्याजागी आता झी मराठी वाहिनीवर सत्यवान सावित्री ही नवीन एक मालिका सुरु होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून आहे.

टॅग्स :झी मराठी