Join us
Daily Top 2Weekly Top 5

'छत्रीवाली' मालिकेचे कथानक उत्कंठावर्धक वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 07:15 IST

स्टार प्रवाहवरील 'छत्रीवाली' मालिकेचे कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.

स्टार प्रवाहवरील 'छत्रीवाली' मालिकेचे कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम आणि मधुराला परिस्थीतीने मात्र वेगळे केले आहे. एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याच्या टप्यावरच त्यांना विरहाला सामोरे जावे लागते आहे. 'छत्रीवाली' मालिकेत मधुरावरील प्रेम व्यक्त करत असतानाच विक्रमचा अपघात होतो. मधुराच्या मनात विक्रमविषयी जरी प्रेम असले तरी ते तिला व्यक्त करता येत नाही. आता तर मधुरा आणि विक्रमच्या घरच्यांकडूनच दोघांच्याही प्रेमाला विरोध होतोय. त्यामुळे विक्रम आणि मधुराच्या प्रेमकहाणीचे पुढे काय होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.‘छत्रीवाली‘ या मालिकेत प्रेक्षकांना एका मुलीची कथा पाहायला मिळणार आहे. छत्रीवाली ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या मधुराची. तर तिकडे जबाबदारीचं भान नसलेला, लाडात वाढलेला मधुराच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आणि तिच्या साधेपणाची सतत टिंगल उडवणारा विक्रम आहे. या दोघांवर आधारीत मालिका आहे. ‘छत्रीवाली‘ या मालिकेत संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संकेत पाठकने या पूर्वी स्टार प्रवाहच्याच दुहेरी या लोकप्रिय मालिकेत दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारली होती तर नम्रताची ही पहिलीच मालिका आहे.मधुरा आणि विक्रम पुन्हा एकत्र येणार का? घरच्यांच्या विरोधापुढे हे दोघे झुकणार की नव्या आयुष्याची सुरुवात करणार? हे पाहण्यासाठी ‘छत्रीवाली’ मालिकेचे आगामी एपिसोड पाहावा लागेल.  

टॅग्स :छत्रीवाली