'Yes,we are evil, ½Á¹ Angelina Jolie say this?' |  ‘हो आहोत आम्ही दुष्ट असं अँजेलिना जोली का म्हणते?

 ‘हो आहोत आम्ही दुष्ट असं अँजेलिना जोली का म्हणते?

-अँजेलिना जोली


स्वत:चं मत असलेली, स्वतंत्र विचारसरणीची, मनाप्रमाणो आयुष्य जगणारी स्री.. यांच्याकडे समाज कसा बघतो? त्या जशा आहेत तसं त्यांना स्वीकारलं जातं का?
त्यांच्या मतांचा आदर केला जातो का? नुसतं इतकंच नाही तर त्यांना एक माणूस  म्हणून जगू तरी दिलं जातं का?
आजच्या काळातही असे प्रश्न पडण्याचं काय कारण? मुळात हे काही तेरावं - चौदावं शतक नाही हे मान्य ! पण तरीही आपल्याचकडे नाही तर जगभरात कुठे ना कुठे स्रियांचं माणूस म्हणून जगणं नाकारलं जातं आहे. त्यांच्या स्वतंत्र विचारांना दडपून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. आपल्या मतांवर कायम आग्रही असणा-याअनेक स्रियांना नावं ठेवली जातात, त्यांच्यावर टीका केली जाते. टोमणो मारले जातात. कसंही करून बंड करून उठलेल्या स्रियांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. संपूर्ण जगात आजही हे होतं आहे.
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हिनं नुकतंच या विषयावर परखड मत मांडणारा एक निबंधच लिहिला आहे. आपल्या निबंधात अँजेलिना इतिहासापासून आजर्पयत मोकळ्या विचारसरणीच्या स्रियांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं यावर  मनमोकळं भाष्य करते. अँजेलिना ही अभिनेत्री तर आहेच शिवाय संस्था-संघटनांसाठी ती काम करत आहे. त्यानिमित्तानं जगभरात फिरत असताना तिला स्रियांबद्दलची जी परिस्थिती दिसली त्यानं ती अस्वस्थ झाली. आपली ही अस्वस्थतता तिनं मोकळेपणानं ‘एले’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या निबंधात व्यक्त केली आहे. 
मनानं मोकळी असणारी, स्री म्हणून शरीराबद्दल असलेला संकोच बाजूला ठेवून स्वच्छंदपणो वावरणारी स्री ही इतिहासापासूनच समाजाला घातक वाटत आली आहे. 
नुसती घातकच वाटली असं नाही तर अशा स्रियांचं खच्चीकरण करण्याची रीतही खूप जुनी आहे .. हा संदर्भ देऊन अँजेलिना आपल्या निबंधाची सुरुवात करते. स्वत:चं लैंगिक आयुष्य स्वत:च्या मनाप्रमाणो जगणा-या, राजकारणं, धर्म यावर आपले विचार खुलेपणानं मांडणा:या, वेगळा पेहराव करणा-या स्रियांना दुष्ट ठरवलं जायचं. त्यांच्यावर दुष्टपणाचा आरोप केला जायचा. नुसता आरोपच नाही तर या स्रियांना आपल्या वेगळ्या विचारसरणीची, वेगळ्या राहाणीमानाची शिक्षाही भोगावी लागायची. अँजेलिना म्हणते की आज मी ज्याप्रकारे माझं स्वत:चं आयुष्य स्वत:च्या विचाराप्रमाणो जगते आहे  ते पाहाता त्या काळात तर मला कितीदातरी जळून मरावं लागलं असतं.
प्रत्येक शतकात, प्रत्येक समाजात स्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तिला गप्प करण्यासाठी दुष्टपणाचं अस्रं उगारलं जायचं. पंधराव्या शतकात फ्रान्समधल्या जोआन ऑफ आर्क हिला जिवंत जाळलं.. का तर ती मूर्तिपूजा करत होती. आणि ती पुरुषांचे कपडे घालत होती म्हणून. पण तिला मारताना तिच्यावर दुष्टपणा केल्याचा आरोप केला गेला. रात्री एका जादूच्या झाडाजवळ ती नृत्य करत होती असं म्हटलं गेलं. आणि तिला जिवंत जाळलं गेलं. हास्यास्पद वाटण्यासारख्या कारणांवरून स्रियांवर अत्याचार केले जात आहेत. त्यांच्यावर र्निबध लादले जात आहेत. अँजेलिना म्हणते की, हे हास्यास्पद आहे की आजही अनेक देशात स्रियांनी नृत्य करणं हे नैतिकतेच्या विरुद्ध समजलं जातं, 
समाजानं जे ठरवून दिलं त्याचा जाच वाटला म्हणून आजर्पयत जगात ज्या ज्या महिलांनी बंड केलं त्यांना अनैसर्गिक, विचित्र, घातक  म्हणून हिणवलं गेलं. नाकारलं गेलं. आजही स्रियांच्या वावरावर, विचारांवर मर्यादा घालणा-या दंतकथा, समजुती अस्तित्वात आहेच. त्यांचा आणि स्वतंत्र विचारसरणी असलेल्या महिला आणि मुलींचा संघर्ष सुरूच आहे. संघर्ष करणा-या या महिलांना  आजही समाज इतिहासातल्याच नजरेनं पाहात दुष्ट आणि समाजविघातक ठरवत आहे. 
आपल्या कामानिमित्त जग फिरताना अँजेलिनाला लक्षात आलं की, ज्या विचारसरणीनं ती जगते आहे ते विचार अनेक देशात निषिद्ध आहेत. अशा देशाची मी नागरिक असते तर मला तुरुंगात जावं लागलं असतं. शरीरावर अन्याय अत्याचाराच्या जखमा बाळगाव्या लागल्या असत्या. असं अँजेलिनाला वाटतं. 
आजही जगातल्या कानाकोप-यात महिला मानवी हक्कासाठी संघर्ष करतात तेव्हा त्यांना सरळ तुरुंगात डांबलं जातं. आजही जगात अनेक ठिकाणी  महिलांमधली ऊर्जा, निर्मितीक्षमता धर्म, समाज आणि संस्कृतीच्या नावाखाली दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. अँजेलिना म्हणते की आज जगभरात 20लाख महिला आणि मुली अशा आहेत ज्यांनी खतनाची वेदना  सहन केली आहे. जगभरात 65 लाख महिला आहेत ज्यांचं वयात येण्याच्या आधीच लग्न करून देण्यात आलं. ज्यांचं बालपण, तारुण्य अवेळीच खुंटवण्यात आलं. हजारो महिला आणि तरुणींची कुटुंब, धर्म, समाज यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी हत्या करण्यात आली. सुदानमधल्या हजारो महिला ज्यांनी मुक्त वातावरणातल्या निवडणुकांची मागणी केली त्यांच्यावर भररस्त्यात अत्याचार करण्याचे आदेश तिथल्या शासनानं दिले. महिलांना दाबून ठेवण्याचे हे मार्ग जगभरात अवलंबले जात आहे. अँजेलिना आपल्या निबंधातून परखडपणे प्रश्न  विचारते की, का महिलांना दुय्यम दर्जा देण्यासाठी जगभरात एवढी ऊर्जा खर्च केली जाते आहे?
अँजेलिना म्हणते की, जगभरात आज ज्या स्रियांवर दुष्टपणाचा आरोप होत आहे त्या स्रिया कोण आहेत, काय करत आहेत हे जर बघितलं तर लक्षात येईल की, या स्रिया निर्भयपणो महिलांवरच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध उभ्या राहिल्या आहेत, जाचक नियम त्या नाकारत आहेत, आपला आवाज बंद करण्यास नकार देत आहे, आपल्या हक्कांवर पाणी सोडण्यास ज्यांचा ठाम नकार आहे. अशा स्रियांना समाज, त्यांचं कुटुंब नाकारत आहेत. त्यांना तुरुंगात डांबत आहेत. त्यांना मृत्यूचं भय दाखवलं जात आहे.
पण अँजेलिना म्हणते की, स्रियांच्या अशा वागण्याला जर दुष्टपणा म्हटलं जात असेल तर आज जगात असा दुष्टपणा करणा-या स्रियांची  गरज आहे. 
पण हेही खरं आहे की, जगातली कोणतीही महिला आपल्याला कोणाशी तरी भांडायचं आहे, कोणाविरुद्ध तरी संघर्ष करायचा आहे म्हणून झोपेतून उठत नाही. अँजेलिना म्हणते की, आम्ही सर्व महिला  मृदू बोलण्याचा, हळुवारपणो वागण्याचा, समजुतीनं, प्रेमानं राहाण्याचाच प्रयत्न करत असतो. प्रत्येकजण काही भांडायला म्हणून जन्माला आलेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाचं काही वाईट करण्याची जादू आमच्याकडे नाही. आमच्याकडे ताकद आहे ती एकमेकांना मदत करण्याची. मोठं काम उभारण्याची उमेद आमच्याकडे आहे. आणि आम्ही महिलांना समान दर्जाचं मानून काम करणा:या पुरुषांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.
 कोणासाठीही आयुष्य म्हणजे काय असतं खरं तर?  - आपल्या मनासारखं, आपल्यासाठी म्हणून काम करता यावं, जगता यावं म्हणजे आयुष्य. पण अँजेलिना म्हणते की जगभरातल्या बहुतांश स्रिया नेहेमी याप्रमाणो जगतच नाही. त्या नेहेमी आपल्या आयुष्याची गाडी ‘रूळावरून उतरून’च जगत असतात. कारण स्रीमध्ये तो जन्मजात गुण आहे. इतरांना सांभाळणं, त्यांना मोठं करणं, इतरांच्या, समाजाच्या अपेक्षांच्या चौकटीत स्वत:ला सामावून घेणं, त्या चौकटीशी जुळवून घेणं हे स्रीच्या रक्तातच आहे. 
त्यामुळेच आपल्याला नेमकं काय व्हावंसं वाटतंय, आपल्याला काय हवंय हा प्रश्न स्वत:ला विचारायला अजूनही महिलांना खूप वेळ लागेल. इतर लोकांचं जाऊ देत माझी माझ्यासाठी काय अपेक्षा आहे याचा शोध घेणं अजूनही काही काळ महिलांना कठीणच जाणार आहे. पण अँजेलिना म्हणते की मला विश्वास आहे की ज्या दिवशी मुली, महिला या स्वत:चं ऐकतील तेव्हाच त्या स्वत:साठीचं आयुष्य निवड करण्यासाठी, स्वत:च आयुष्य बदलण्यासाठी, नवीन काहीतरी शिकण्यासाठी पहिलं पाऊल टाकतील. 
अँजेलिना म्हणते की, मी माझ्या मुलीला नेहेमी सांगते की आपलं मन, आपले विचार तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तू कितीही छान ड्रेस घाल. पण तुला खरी सुंदरता हा ड्रेस नाही तर तुझे विचारच देतील. आणि जर तुझं मन हे कणखरनसेल, विचार हे स्वच्छ आणि स्पष्ट नसतील तर शरीरावरच्या त्या चांगल्या ड्रेसमुळे तुझ्यात अंशाचीही कणखरभर पडणार नाही. तुझा ड्रेस नाही तर तुङो विचार तुला सुंदर बनवतील. एक स्री म्हणून स्वत:ची असलेली इच्छा आणि तुझी स्वतंत्र मतं हेच तुला मोहक बनवतील.
अशा स्वतंत्र विचार असलेल्या, स्वत:चं मत असलेल्या स्रिया दुष्ट असतील तर हा दुष्टपणा करणा-या स्रिया जगातल्या कानाकोप-यात भेटतील, असं अँजेलिना आपल्या निबंधाच्या शेवटी म्हणते.

 

 

Web Title: 'Yes,we are evil, ½Á¹ Angelina Jolie say this?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.