Why compare women's sexuality with men's? | स्त्रियांच्या कामभावनेची तुलना पुरूषांशी का करावी? 

स्त्रियांच्या कामभावनेची तुलना पुरूषांशी का करावी? 

- डॉ. ऊजिर्ता कुलकर्णी

ज्या वेळेस आपण कामेच्छा असं म्हणतो, तेव्हा कामजीवनातील रस, आवड याचसोबत, आपसूक त्यात भाग, किंवा पुढाकार घ्यावासा वाटणं हे सारंच  अंतर्भूत. त्यामुळे अर्थातच ‘कामेच्छा’ यांवर परीणाम करणारे कितीतरी घटक आहेत. तसंच त्याबाबत अनेक समज-गैरसमजही आहेत. विशेषत: स्त्रियांबाबत. हे केवळ पुरूषवर्गात आहेत असं नाही, तर यांत स्त्रियांचंही प्रमाण खूप जास्त. वैयक्तिकरित्या आपापली कामेच्छा ओळखतां न येणं, त्याविषयी काहीतरी गंड असणं, किंवा त्यासंदर्भात, ‘ब्र’ही न उच्चारण्याची मानसिकता, तसंच सातत्यानं कामजीवनाच्या एकंदर विचारांना दडपून, दाबून टाकण्याची प्रवृत्ती, किंवा बाल वयापासून विशेषत: स्त्रियांनी याबाबत बोलू नये.अशा त्यांच्यासाठी समाजानं पक्क्या केलेल्या धारणा; हे तर अनेक स्त्रियांमध्ये सर्रास दिसतं.
कामजीवन, समज आणि परिणाम
*  कामजीवन/ सेक्स हे अनावश्यक आहे.
 * ते किळसवाणं, घाणोरडं आहे.
*  सेक्सबद्दल किंवा त्यातल्या स्वत:च्या भावनेबद्दल बोलणं हा गुन्हा आहे.  तसं बोलणा-या  स्त्रिया/ मुली यांना सरसकट सगळा समाज नावं ठेवतो.
 * हस्तमैथून हा केवळ पुरूषांचा प्रांत आहे. स्त्रियांनी ते चुकूनही करू नये, हा समज. 
*  स्वेच्छेनं एकापेक्षा अधिक व्यक्तींशी संबंध ठेवणं, यांत पुरूषांचं ‘पौरूषत्व’ झळकतं. तर असं करणा-या स्त्रिला मात्र समाज नावं ठेवून नाकारतो. 
 लैंगिक अभिमुखता, लैंगिक स्वातंत्र्य किंवा या आयुष्याशी संबंधित इतर शंका/ तक्रारी, याबाबत गप्प बसलेलं उत्तम.
 * स्त्री म्हणून, प्रत्येक स्त्रिची कामेच्छा ही कायम पुरूषापेक्षा कमीच हवी. त्यातच त्या स्त्रिला समाधान मिळवता आलंच पाहिजे.

एक शंका आणि उत्तर

स्त्रियांची कामेच्छा पुरूषापेक्षा अधिक असते की कमी असते?

* तर कामेच्छा लिंगसापेक्ष नाही , ती व्यक्तीनिहाय ठरते.
 * शिवाय स्त्रियांच्या बाबत हे त्यांच्या मासिक पाळीच्या काही दिवसांवर काही अंशी अवलंबूनही असते. हार्मोन्सनुसार यात बदल होत राहातो. म्हणूनच अनेकदा, ओव्ह्युलेशन पिरियेड, म्हणजे स्त्रीबीज तयार होऊन परिपक्व  होतं. त्यावेळेस स्त्रियांमध्ये कामभावना अधिक असते.
*  काही स्त्रियांबाबत, पाळीतील रक्तस्त्रव होतो, त्याहीवेळेस ती वाढलेली दिसू शकते.
 पाळीच्या एखाद-दोन दिवस आधी किंवा रक्तस्त्रव संपल्यावर लगेचच, अशी देखाल ती बळावू शकते. त्यांच्या हार्मोन्सप्रमाणोच, जोडीदारासोबत असणारं मानसिक नातं, भावनिक गुंतवणूक याही बाबी बहुतांश स्त्रियांच्या कामेच्छेवर परिणाम करतात.
*  स्त्रिया सेक्ससाठी उत्सुक असतील तर ते त्यांच्या हावभावातून, विभ्रमातून, सहज जाणवू शकते. अनेकदा जोडीदारांमध्ये कामजीवनाबाबत पुरेसा मोकळेपणा असेल किंवा, सामंजस्य असेल, तर स्त्रियांमधील हे ठळक- सूक्ष्म बदल जोडीदाराला सहज लक्षात येणारे असतात. ते ओळखून स्त्रिची कामभावना अधिक उत्तेजित केली, तर अर्थातच दोघांनाही काम क्रीडेचा आनंद घेता येतो.
 * स्त्रियांबाबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जर त्या सेक्ससाठी उत्सुक  असतील, तर क्रिडेमध्ये त्यांच्या योनीमार्गात ओलसरपणा यायला सुरूवात होते. अर्थात काही प्रकारच्या संसर्गामुळे, काही आजारंमुळे, प्रसुतीमुळे किंवा वयानुसार होणा-या बदलांमुळे, अनेकदा कामेच्छा प्रबळ असूनही, योनीमार्गात कोरडेपणा जाणवू शकतो. इथे योग्य मानसिक , शारीरीक उपचारांची गरज असते.
 * कामजीवनात स्त्रिया पुरूषांइतक्याच चोखंदळ,   सक्रीय, वैविध्यपूर्ण, वय    आक्रमकही असू शकतात. त्यांच्या विशीष्ट आवडीनिवडींचा परिणाम अर्थातच त्यांना हव्या असणा:या आनंदावर होतो.
 * अनेकदा काही स्त्रिया अचानकपणो त्यांच्या कामेच्छेत बदल झाल्याचं  सांगतात. ती कधी बळावलेली असते, तर कधी, मंदावलेली. ते ही स्त्रिचं एकंदर मानसिक, शारीरिक स्वास्थ्य, आजूबाजूची परिस्थती, तिचं लैंगिक स्वातंत्र्य आणि जोडीदार या सर्वांवरच अवलंबून असते.  यात निसर्गत : स्त्री- पुरूष म्हणून असणारा भेद अनेक ठिकाणी डोकावत असला तरीही, ‘स्त्रिची- पुरूषाची’ कामेच्छा केवळ असाच विचार न करता, ‘व्यक्तीची’ कामेच्छा असं याकडे बघितलं तर ते अधिक योग्य.
सल्ला, मार्गदर्शन महत्त्वाचं!
आपापली कामेच्छा किती आहे, ती कमी जाणवते, योग्य वाटते की मर्यादेपेक्षा जास्त वाटते, हे प्रत्येक जण आपापले जोखू शकत असेल तरीही, यांत काही बाबतीत निरक्षणं महत्वाची ठरतात. केवळ सेक्सचेच विचार सतत येत    असतील, किंवा योग्य प्रकारे सेक्स करूनही ते समाधानकारक वाटत  नसेल, तर अशावेळेस तज्ज्ञांना भेटणं आवश्यक. तसंच यातला संपूर्ण रस गेला असेल किंवा संपूर्ण निरिच्छ वाटत असेल तरीही. सातत्यानं येणारे कामुक विचार यातून हस्तमैथुनाचं व्यसन स्त्री-पुरु ष दोघांमध्येही आढळू शकते. असं व्यसन निर्माण झालं असेल, तर त्याविषयी नि:संकोचपणो सल्ला घ्यावा. स्त्रियांच्या बाबत, हस्तमैथुनासाठी काही साधनंही उपलब्ध असतात. जसं की बॅटरीवर चालणारे व्हायब्रेटर्स इत्यादी. यातही अनेक प्रकार आहेत. पैकी वैयक्तिक तो कसा वापरावा, कोणता वापरावा, यासाठी देखोल  तज्ज्ञांचं मार्गदर्शन उपयोगी ठरतं.
सक्रीय सहभागाचा दृष्टिकोन
काही स्त्रियांचा कामजीवनाबाबत अजून एक दृष्टिकोन असा की, यात भाविनक, मानसिक गुंतवणुकीपेक्षा, दोन्ही जोडीदारांनी शारीरिक क्रि येतून, समाधान, आनंद मिळवणं.सध्या प्रचलित असलेल्या वन नाइट स्टॅण्ड, किंवा एका रात्रीपुरतीची मजा, यामध्ये मुली, स्त्रिया यादेखील तितक्याच सक्रीय आहेत. लैंगिक आयुष्य, त्यामध्ये आपल्याला नेमकं  काय हवं आहे, यासाठी सजग असणा:या  स्त्रियांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यामुळे जोडीदारापैकी, केवळ पुरु षाची इच्छा असेल तेव्हा सेक्स करणं, त्याच्याकडे केवळ, एक उरकून टाकण्याची बाब असं न पाहता तिला सहजीवनातील अविभाज्य स्थान मिळत आहे. त्यात स्त्रिया स्वत:च आपल्या इच्छा, अपेक्षा यासाठी आग्रही आहेत. अर्थात त्यामुळे पुरु षांवरचं एक ओझं  तुलनेनं  कमी होत चाललं आहे. ते म्हणजे, कामजीवनातला आनंद ही  केवळ पुरु षाची जबाबदारी, ही मानसिकता बदलते आहे!

(लेखिका होमिओपॅथिक तज्ज्ञ असून, मानसोपचार, लैंगिक समस्या या विषयात समुपदेशन करतात.)

urjita.kulkarni@gmail.com

(वाचक या संबंधातील आपले प्रश्न, समस्या पाठवू शकतात. त्यासाठी वर दिलेल्या ई-मेलचा वापर करता येईल.)

 

 

Web Title: Why compare women's sexuality with men's?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.