Weight loss, but stretch mark? At home, try this for stretch marks , home remedy | वजन घटवलं, पण स्ट्रेच मार्क आले? घरच्याघरी ‘हे’ उपाय करुन पहा, स्ट्रेच मार्क गायब

वजन घटवलं, पण स्ट्रेच मार्क आले? घरच्याघरी ‘हे’ उपाय करुन पहा, स्ट्रेच मार्क गायब

ठळक मुद्देसाधे हेल्दी पॅक घरच्याघरी करुन लावा

सखी ऑनलाइन टीम

हिवाळ्याचे दिवस म्हणजे त्वचेला जपण्याचे आणि जोपासण्याचे दिवस. गुलाबी थंडी ही कितीही हवीहवीशी वाटली तरी तिचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही. हिवाळ्यात त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. स्ट्रेच मार्क ही त्या अनेक समस्यातील एक समस्या. हल्ली वजन कमी करण्याचा प्रयत्त्न जो तो करतो. पण वाढलेलं वजन कमी झालं की त्वचेवर स्ट्रेच मार्क्‍स राहतात. एकवेळ वाढलेलं वजन परवडतं पण अवेळी चेहेर्‍यावर प्रौढत्त्वाचा भास उमटवणारे हे स्ट्रेच मार्क्‍स मात्र नकोसे वाटतात. 
स्ट्रेच मार्क्‍स दिसत असले, महागड्या क्रीम्स वापरूनही जात नसले म्हणून चिंतीत होण्याचं कारण नाही. कारण काही घरगुती उपाय आणि नैसर्गिक घटकांच्या उपचारांनी हे स्ट्रेच मार्क्‍स सहजपणे जाऊ शकतात. 

तीळ तेल आणि मधाचा मसाज

1) हा मसाज करण्यासाठी अर्धा कप तीळाचं तेल, अर्धा कप बदाम, अर्धा कप मध आणि एक चमचा हळद घ्यावी. 
2) हे सर्व साहित्य मिक्सरमधून काढावं. यची लोशनसारखी पेस्ट तयार होते. ही पेस्ट आंघोळीच्या आधी संपूर्ण शरीराला हलक्या हातानं मसाज करत लावावी. मसाज केल्यानंतर थोड्या वेळ थांबावं. नंतर थोड्या दुधानं ही पेस्ट धुवावी आणि नंतर पाण्यानं स्वच्छ करावी. 


मसूर तेल आणि ग्लिसरीनचा मसाज

1) एक कप लाल मसूर दाळ, एक चमचा हळद, अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा ग्लिसरीन किंवा मध आणि अर्धा कप तीळाचं तेल घ्यावं. 
2) ब्लेंडर किंवा मिक्सरच्या साहाय्यानं हे सर्व साहित्य एकत्र करून त्याची जाडसर पेस्ट बनवावी. शरीरावर जिथे जिथे स्ट्रेच मार्क्‍स आहेत तिथे ही पेस्ट चांगली मसाज करत लावावी. थोडीशी ती कोरडी होवू द्यावी. नंतर पाण्याचा वापर न करता हातानं चोळून लावलेली पेस्ट काढावी. थोडसं दूध घेवून परत मसाज करावा. आणि मग कोमट पाण्यात थोडसं गुलाब पाणी घालून पेस्ट धुवावी. 
3) या उपायामुळे फक्त स्ट्रेच मार्क्‍स कमी होतात असं नाही तर त्वचाही मऊ मुलायम होते. 

सुंगधी  मसाज


1) 100 मिलीलिटर गव्हाच्या कोंबाचं तेल,  पाच थेंब धूपाचं तेल ( फ्रॅंकिंग सेन्स ऑइल)  आणि पाच थेंब टॅंजरिन ऑइल घ्यावं. एका वाटीत ही सर्व तेल एकत्र करावी. आणि हे तेल शरीरावर जिथे स्ट्रेच मार्क किंवा चट्टे जाणवतात तिथे मसाज  करत लावावं. 
2) गव्हाचे कोंब यामध्ये इ जीवनसत्त्वं असतं जे शरीरावरचे चट्टे कमी करण्यास फायदेशीर ठरतं. धुपाच्या तेलात नवनिर्मितीचं सामथ्र्य असतं. त्याचा उपयोग केल्यास त्वचेला नवा तजेला मिळतो आणि टॅंजरिन ऑइलमध्ये क जीवनसत्त्वं असतं. ज्याच्या उपयोगामुळे त्वचा लवचिक होते. हे तेल जास्त झाल्यास एका बाटलीत भरून ठेवावं. आणि रोज थोडं थोडं वापरावं.
 
 

Web Title: Weight loss, but stretch mark? At home, try this for stretch marks , home remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.