Join us  

आपलं वजन वाढणार आहे, शरीर देतं सिग्नल! वेळीच ५ गोष्टी तपासा, वजनवाढ टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2024 5:39 PM

तुमचं वजन वाढतं आहे, लक्ष द्या असं शरीर सांगतं, प्रश्न एवढाच की आपण लक्ष देतो का?

ठळक मुद्देआपल्या शरीराचं काहीतरी म्हणणं आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवं. तशी कारणं आणि लक्षणं आपल्याला दिसत असतात.

वैद्य रजनी गोखले (आयुर्वेदतज्ज्ञ)

वजन वाढलं की कमी कसं करायचं याचं अनेकांना टेंशन येतं. ते कमी करण्यासाठी व्यायाम ते डाएट वाट्टेल ते उपाय केले जातात. शर्थीचे प्रयत्न होतात.  वजन हा खरंच चिंतेचा विषय बनतो. दिवसागणिक वाढणारं वजन या समस्येला अनेकांना तोंड द्यावं लागतंय. पण वजन काही एका रात्रीत वाढत नाही. आपलं वजन वाढत आहे याकडे वेळीच लक्ष का देत नाही? त्याची लक्षणं आपलं शरीर सांगत असतं.वजन काही एकदम वाढत नाही. ते खूप वाढलं की आता वजन कमी करा म्हणून प्रयत्न सुरु होतात मात्र वजन आपलं वाढत आहे, आपल्या शरीराचं काहीतरी म्हणणं आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवं. तशी कारणं आणि लक्षणं आपल्याला दिसत असतात.

 

वजन वाढण्याची कारणं..१. भूक नसताना खाणं२. जेवणानंतर पुन्हा खाणं३. शारीरिक श्रमांचा विचार न करता खाणं४. सतत बैठं काम करणं५. व्यायामाचा अभाव६. दिवसा तास न तास झोपणं या सर्व कारणांनी स्थूलता वाढत जाते. 

वजन वाढतं आहे हे कसं समजावं?१. चालताना , जिन्यांवरून चढ-उतर करताना धाप लागणं, घामाचं प्रमाण वाढणं.२. सतत भूक लागणं, भूक सहन न होणं.३. गुडघे किंवा टाचा दुखणं.४. स्त्रियांमध्ये मासिक पाळीची अनियमितता वाढणं, स्त्रावाचं प्रमाण कमी होणं५. वजन काट्यावर जरी वजन वाढलेलं दिसत नसलं तरी ही लक्षणं म्हणजे स्थूलतेची नांदी समजावी आणि त्वरित जागं व्हावं.

वजन घटवायचं असेल तर..१. साखर, गूळ इ. गोड पदार्थ पूर्णत: बंद करावेत.२. आहारातलं मीठाचं प्रमाण कमी असावं. समुद्रमीठाऐवजी सैंधव मीठ वापरावं.३. आहारात भाज्यांचं सूप्स, सॅलेड, धान्याचं कढण यावर अधिक भर असावा.४. धान्य भाजून मगच वापरावं.५. तेलकट तूपकट पदार्थाचा वापर कमी करावा.६. बेकरी प्रॉडक्टस, फास्ट फूड पूर्णत: बंद करावेत.

 

७. डोसा, इडली यासारखे आंबवलेल्या पदार्थ अवश्य टाळावेत.८. दुपारची झोप कटाक्षानं टाळावी.९. वाढतं वजन हे एखाद्या छोट्या-मोठ्या आजाराचंही लक्षणंही असू शकतं त्यामुळे वेळीच आपल्या डॉक्टरांना भेटावं.

टॅग्स :आरोग्यवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स