Women Weight Loss Tips : वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. हार्मोन्समध्ये बदल, मेटाबॉलिझम कमी होणे आणि स्नायूंची ताकद घटणे यामुळे वजन पटकन वाढू शकतं. त्यामुळे 50 वयानंतर वजन कमी करणं अनेक महिलांसाठी आव्हानात्मक ठरतं. पन्नाशीनंतरचे साधारण ४४ टक्के लोक लठ्ठपणाचे शिकार आहेत. अशात पन्नाशीत असलेल्या महिलांनी वजन कंट्रोल ठेवण्यासाठी रोज किती पावलं चालावीत हा महत्वाचा प्रश्न ठरतो? संशोधनातून याचं उत्तर समोर आलंय.
संशोधनात काय समोर आलं?
इंटरनॅशनल जर्नल ऑफ एनव्हार्यमेंटल रिसर्च अॅन्ड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित एका संशोधनात 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचं आढळलं. या अभ्यासात अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतील 3,758 लोकांचा समावेश करण्यात आला होता.
50+ महिलांनी रोज किती चालावं?
संशोधकांच्या मते, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी रोज सुमारे 8,500 पावलं चालणं फायदेशीर ठरू शकतं.
रोज चालण्याचे फायदे
वजन कमी होण्यास मदत होते
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते
हृदयाचं आरोग्य सुधारते
शरीर अधिक सक्रिय राहते
स्टॅमिना आणि फिटनेस वाढतो
डायबिटीस आणि बीपीचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते
चालताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
सुरुवातीला कमी पावलं चालून हळूहळू संख्या वाढवा
आरामदायक शूज वापरा
पुरेसं पाणी प्या
खूप थकवा जाणवल्यास विश्रांती घ्या
संतुलित आहारासोबत चालण्याची सवय ठेवा
तज्ज्ञांच्या मते, नियमितपणे जर पन्नाशीत असलेल्या महिला 8,500 पावलं चालल्या आणि हेल्दी लाइफस्टाईल फॉलो केली तर त्यांचं वजन नियंत्रणात ठेवणं शक्य आहे.
Web Summary : Women over 50 can manage weight by walking 8,500 steps daily. Research suggests this helps reduce obesity, improve heart health, and increase fitness when combined with a healthy lifestyle.
Web Summary : 50 वर्ष से अधिक उम्र की महिलाएं रोजाना 8,500 कदम चलकर वजन नियंत्रित कर सकती हैं। शोध बताते हैं कि यह मोटापे को कम करने, हृदय स्वास्थ्य को बेहतर बनाने और स्वस्थ जीवनशैली के साथ फिटनेस बढ़ाने में मदद करता है।